आता आॅनलाइन राखी
By admin | Published: August 24, 2015 02:10 AM2015-08-24T02:10:37+5:302015-08-24T02:10:37+5:30
‘हर राखी कुछ कहती हंै’ या उक्तीप्रमाणे आपल्या भावाच्या आवडीनिवडीचा विचार करून आता राखी बनविणे शक्य होणार आहे. बहिणींच्या कल्पकतेला वाव देत
मुंबई : ‘हर राखी कुछ कहती हंै’ या उक्तीप्रमाणे आपल्या भावाच्या आवडीनिवडीचा विचार करून आता राखी बनविणे शक्य होणार आहे. बहिणींच्या कल्पकतेला वाव देत काही संकेतस्थळांच्या माध्यमातून आता आॅनलाइन राखी बनविणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे एकेकाळी पोस्टाने पाठविणाऱ्या जाणाऱ्या राख्या आता केवळ एका क्लिकवर तयार करून कमी वेळात भावापर्यंत पोहोचविता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुजरातच्या चकाकणाऱ्या खड्यांंच्या आणि पेंड्टच्या राख्या बहिणींसोबत भाऊरायांच्याही पसंतीला उतरत आहेत. रक्षाबंधनानंतर या राख्यांचा वापर ब्रेसलेटसारखा करण्याचा नवा ट्रेंड सेट होतो आहे. त्यामुळे आता लहान भावापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या पसंतीप्रमाणे राखी बांधण्याकडे अधिक कल दिसतो आहे. काही संकेतस्थळांनी खास रक्षाबंधनाचे औचित्य साधत हा पर्याय नव्याने सुरू केला आहे. त्यात खडे, मोती, कार्टून्स, ब्रेसलेट राखी, जडीबुटी राखी, मौली राखी, मेटल राखी, लुम्बा राखी, डोरी राखी, फॅन्सी राखी डायमंड राखी, स्टोन राखी, चंदन राखी, रुद्राक्ष राखी, रेशमी राखी, अशा वेगवेगळ््या प्रकारच्या राख्या तयार करता येतात. शिवाय काही मिनिटांत तयार होणाऱ्या या राख्या भावापर्यंत पोहोचविण्याची सेवाही संकेतस्थळांनी दिली आहे. (प्रतिनिधी)