नवी दिल्ली : विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनी भारत सरकारतर्फे जाहीर होणारे ‘पद्म’ पुरस्कार यापुढे देशातील जनतेच्या शिफारशींवरून दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केली.निती आयोगाने उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत ‘पद्म’ पुरस्कारांसाठी निवड विविध मंत्रालयांच्या शिफारशींच्या आधारे केली जात असे. केंद्र सरकारने यात थोडी सुधारणा करून केवळ सरकारी शिफारशीचे बंधन काढून टाकले आहे. यापुढे देशातील कोणीही नागरिक ‘पद्म’ पुरस्कारासाठी नावांची आॅनलाइन शिफारस करू शकेल.>नागरिकांवर आमचा विश्वासया बदलामुळे प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करणाºया खºया ‘हीरों’च्या कामाचे योग्य मूल्यमापन होईल, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक नागरिक आपल्या परीने देशासाठी काही तरी करू शकतो आणि तो तसे करत असतो असा आमच्या सरकारचा दृढ विश्वास आहे व म्हणूनच आम्हाला देशाला बलवान करणयासाठी नागरिकांच्या या बलस्थानांचे एकत्रीकरण करायचे आहे.
यापुढे पद्म पुरस्कार जनतेच्या शिफारशीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:22 AM