Join us  

आता चिंचपोकळी पुलाची दुरुस्ती

By admin | Published: April 14, 2017 3:53 AM

चिंचपोकळी पुलाचा पृष्ठभाग वाहतुकीच्या दृिष्टकोनातून खराब झाला असून, भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, याकरिता महापालिकेकडून चिंचपोकळी

मुंबई : चिंचपोकळी पुलाचा पृष्ठभाग वाहतुकीच्या दृिष्टकोनातून खराब झाला असून, भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, याकरिता महापालिकेकडून चिंचपोकळी पुलाच्या दुरुस्तीचे काम १७ एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे. काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता चिंचपोकळी पुलावरून भायखळा वाहतूक विभागाच्या हद्दीतून परब चौक येथून नागपाडा वाहतूक विभागाच्या हद्दीत चिंचपोकळी जंक्शनकडे जाणारी वाहतूक ही नियमितपणे सुरू राहील.परंतु नागपाडा वाहतूक विभागाच्या हद्दीतून चिंचपोकळी जंक्शनकडून भायखळा वाहतूक विभागाच्या हद्दीतील परब चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीस निर्बंध घालण्यात येणार आहेत. चिंचपोकळी पुलावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहतूक नियमित असणार आहे;परंतु पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी वाहतूक बंद करून चिंचपोकळी पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत काम चालू झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत ‘एकतर्फा’ वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे.वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग म्हणून चिंचपोकळी पुलावरून पूर्वेकडे संत जगनाडे चौकात येऊन दादरकडे जाणारी वाहतूक ही चिंचपोकळी जंक्शन येथून सरळ न येता एन. एम. जोशी मार्गे शिंगटे मास्तर चौक जंक्शन येथे येऊन करी रोड पुलावरून पुढे भारतमाता जंक्शन येथून इच्छित स्थळी मार्गक्रमण करेल. चिंचपोकळी पुलावरून पूर्वेकडे संत जगनाडे चौकात येऊन दक्षिण मुंबई पूर्वेकडे जाणारी वाहतूक ही चिंचपोकळी जंक्शन येथून एन. एम. जोशी मार्गाने एस ब्रिज जंक्शन येथे येऊन एस ब्रिजवरून पूर्वेकडे येईल व पुढे इच्छित स्थळी मार्गक्रमण करेल, असे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)सहकार्याचे आवाहनवाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने व रस्त्याने वाहनांना येताना-जाताना कमी त्रास होईल, यादृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.नागरिकांना व वाहनचालकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी महापालिकेला व वाहतूक पोलिसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.