आता सलमानची केस डायरी हरवली

By admin | Published: August 22, 2014 01:37 AM2014-08-22T01:37:37+5:302014-08-22T01:37:37+5:30

अभिनेता सलमान खान प्रमुख आरोपी असलेला आणि गेली बारा वर्षे प्रलंबित असलेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची केस डायरीच आता हरवली आहे.

Now Salman's case diary is missing | आता सलमानची केस डायरी हरवली

आता सलमानची केस डायरी हरवली

Next
मुंबई : अभिनेता सलमान खान प्रमुख आरोपी असलेला आणि गेली बारा वर्षे प्रलंबित असलेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची केस डायरीच आता हरवली आहे. गुरूवारी हा खटला पुन्हा तीन आठवडय़ांसाठी तहकूब करण्यात आला़
केस डायरी हरवल्याने सत्र न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी थेट गणोश विसजर्नानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला ठेवली आह़े त्यावेळी सरकारी पक्षाला त्यांची भूमिका स्पष्ट करायची आह़े
63 पैकी केवळ 7 साक्षीदारांच्या जबाबाची खरी प्रत उपलब्ध असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले होत़े त्यामुळे सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी कागदपत्रंची खरी प्रत सादर होईर्पयत कामकाज चालू शकत नसल्याचा दावा केला़ यावर सरकारी पक्षाने आक्षेप घेतला. जबाबाच्या प्रमाणित प्रतीच्या आधारे खटल्याचे कामकाज चालू शकते आणि हा खटला आधी वांद्रे न्यायालयात सुरू होता़ तेथून सत्र न्यायालयात खटला वर्ग झाल्यानंतर ही  खरी कागदपत्रे गहाळ झाली आहेत़ त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असा युक्तिवादही सरकारी पक्षाने केला़ त्यावर न्यायालयाने गहाळ झालेल्या कागदपत्रंसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश  सरकारी पक्षाला दिल़े तपास अधिकारी निवृत्त पोलीस किसन हेगडे यांनाही हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
वांद्रे येथे 2क्क्2 मध्ये सलमानच्या भरधाव गाडीने चौघांना चिरडल़े त्यात एकाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा खटला सुरू आह़े त्यात दोषी आढल्यास सलमानला दहा वर्षार्पयत शिक्षा होऊ शकत़े (प्रतिनिधी)
 
च्खटल्यातील 63 साक्षीदारांपैकी केवळ 7 साक्षीदारांच्या जबाबाची खरी प्रत उपलब्ध असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले होत़े त्यामुळे सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी संबंधित कागदपत्रंची खरी प्रत सादर होईर्पयत खटल्याचे कामकाज चालू शकत नसल्याचा दावा केला़

 

Web Title: Now Salman's case diary is missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.