आता ‘सेल्फी विथ डॉक्टर’

By admin | Published: November 2, 2015 02:27 AM2015-11-02T02:27:01+5:302015-11-02T02:27:01+5:30

प्रियजनांबरोबर सेल्फी काढून सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो अपलोड करण्याचा ट्रेण्ड आहे. जवळच्या व्यक्तींसोबत सेल्फी काढले जातात. नेमकी हीच मानसिकता लक्षात घेऊन महाराष्ट्र असोसिएशन

Now 'selfie with doctor' | आता ‘सेल्फी विथ डॉक्टर’

आता ‘सेल्फी विथ डॉक्टर’

Next

मुंबई : प्रियजनांबरोबर सेल्फी काढून सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो अपलोड करण्याचा ट्रेण्ड आहे. जवळच्या व्यक्तींसोबत सेल्फी काढले जातात. नेमकी हीच मानसिकता लक्षात घेऊन महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने ‘सेल्फी विथ डॉक्टर’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील नातेसंबंध सुधारण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मार्डकडून सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे प्रकार राज्यभरात वाढत आहेत. रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास संतप्त झाल्याने काही नातेवाईक डॉक्टरांना शिवीगाळ, मारहाण करतात. तर, काहीवेळा रुग्णालयाची तोडफोड केली जाते. शहर अथवा ग्रामीण भागातच नाही, तर संपूर्ण राज्यात हे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करावी, हा पर्याय बहुतांश शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत निवडण्यात आला. खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि डॉक्टरांनी सुरक्षेत वाढ केली आहे. मारहाणीचे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षा वाढवणे, हा एकच पर्याय असू शकत नाही. असे प्रकार घडण्याचे मूळ कारण हे डॉक्टर आणि रुग्णांमधील बदलेले नातेसंबंध हे आहे. या नातेसंबंधात बदल होण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद वाढणे आवश्यक आहे. पण, सध्याच्या ट्रेण्डनुसार, सेल्फीच्या माध्यमातून दृढ नातेसंबंध दिसून येतात. मग, हाच फंडा डॉक्टर आणि रुग्णांसाठी वापरायचे ठरवण्यात आल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी फेसबुकवर ँं’’ ङ्मा २ँेंी : २ं५ी ङ्मिू३ङ्म१२ ा१ङ्मे ं२२ं४’३ं२ हे पेज सुरू करण्यात आले आहे. या पेजवर १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सामान्यांना आणि डॉक्टरांना सेल्फी काढून पेजवर पोस्ट करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही डॉक्टरने तुमच्यावर उपचार केले तर, त्याच्याबरोबर सेल्फी टाका, असे आवाहन मार्ड संघटनेने केले आहे. जितके जास्त फोटो अपलोड होतील, त्याच्या माध्यमातून स्क्रिझोफेनिया रुग्णांना मदत केली जाणार असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Now 'selfie with doctor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.