Join us

आठ महापालिका, सात नगरपालिकांसाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 3:06 AM

या प्राधिकरणासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आयएएस दर्जाचे अधिकारी हे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

मुंबई : मुंबई महापालिका वगळता मुंबई महागनर प्रदेश क्षेत्रातील आठ महापालिका आणि सात नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचे मुख्यालय ठाणे असेल.

या प्राधिकरणासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आयएएस दर्जाचे अधिकारी हे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिका (सिडको आणि नैना क्षेत्रासह), ठाणे, पनवेल,कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर अशा एकूण ८ महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर, अलिबाग, पेण, खोपोली, माथेरान आणि कर्जत अशा एकूण ७ नगरपालिकांचे एकच प्राधिकरण राहील.

यासंदर्भात राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाची शिफारस राज्य शासनाने स्वीकारली. आता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये एसआरए लागू करण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र अभ्यासगट नेमण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका