आता पाय पसरून लोकल प्रवास!

By admin | Published: December 29, 2015 02:21 AM2015-12-29T02:21:37+5:302015-12-29T08:49:45+5:30

लोकलच्या डब्यात प्रवेश करताच आसन पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी धडपड, गरज पडल्यास चौथ्या आसनावरही बसण्यासाठी प्रवाशांची होणारी मारामार नेहमीच पाहायला मिळते.

Now spread the legs and travel in the local! | आता पाय पसरून लोकल प्रवास!

आता पाय पसरून लोकल प्रवास!

Next

- सुशांत मोरे,  मुंबई

लोकलच्या डब्यात प्रवेश करताच आसन पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी धडपड, गरज पडल्यास चौथ्या आसनावरही बसण्यासाठी प्रवाशांची होणारी मारामार नेहमीच पाहायला मिळते. मात्र आता प्रवासी संख्या वाढविण्याचा नवा प्रयोग प्रत्यक्षात आल्यानंतर हा रोजचा झगडा आणखी तीव्र होणार असून, कोणाला आसन मिळते, याची जणू स्पर्धाच रंगणार आहे. ज्यांना आसन मिळणार नाही, ते भारतीय बैठक मारण्याचीच शक्यता आहे. आसन व्यवस्थेतील बदलाद्वारे ‘बस झाला उभ्याने प्रवास, आता पाय पसरून प्रवास...’ असेच काहीसे रेल्वे सूचवत आहे की काय, असे वाटू लागले आहे.
गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच गर्दीतला प्रवास सुकर करताना जास्तीतजास्त प्रवाशांना डब्यात सामावून घेण्यासाठी आसन व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला.
त्यानुसार एका लोकलच्या पाच डब्यांतील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. यातील चौथा डबा हा मेट्रोच्या आसनव्यवस्थेप्रमाणे करण्यात आला असून, ५, ६, ९ आणि १०व्या डब्यातील दरवाज्याकडील प्रत्येकी एक आसन काढून
टाकण्यात आले. हे बदल करतानाच जादा ११२ प्रवासी प्रवास करू शकतील, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.
अशा प्रकारची बदल करण्यात आलेली लोकल २५ डिसेंबर रोजी सुटीच्या दिवशी धावल्यानंतर त्याची खरी कसोटी सोमवारपासून गर्दीच्या वेळेत होती. आसन व्यवस्थेत बदल केलेली लोकल सोमवारी दुपारी १२.२३ वाजता कसाऱ्याहून सुटली. मात्र ही लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होती.
त्यामुळे डोंबिवलीला ही
लोकल पकडण्यासाठी एकच गर्दी झाली. डोंबिवली ते सीएसटी प्रवास करताना आसन व्यवस्थेतील बदलामुळे प्रवाशांना बसण्यासाठी कसरत करावी लागली. आसनगाव, टिटवाळा येथून लोकल पकडलेल्या प्रवाशांनी तर आसन नसल्याने खाली बसून पाय पसरूनच प्रवास केला आहे.

प्रवासी गोंधळले
प्रत्येक स्थानकावर गर्दी वाढतच असल्याने खाली बसलेल्या प्रवाशांना उभे असलेल्यांचा अडथळा येत होता. काही स्थानकांत चढलेल्या प्रवाशांना हा डबा सामान वाहून नेण्याचा किंवा अपंगांचा असावा असे वाटले. त्यामुळे चढलेले प्रवासी पुन्हा उतरण्यासाठी घाई करत होते. दादर स्थानक येईपर्यंत सगळ्याच प्रवाशांना अशा प्रकारची कसरत करावी लागत असल्याने प्रवासी एकमेकांकडे पाहून हसतही होते; आणि हा बदल योग्य आहे का यावर चर्चा करत पुढचा प्रवास करत होते.

प्रवाशांची प्रतिक्रिया...
मी कुर्ल्याला कामाला जातो. आसन उपलब्ध नसल्याने आसनगावहून खाली बसूनच प्रवास करावा लागला आहे. नव्या आसनव्यवस्थेमुळे प्रवाशांना लांबच्या प्रवासात बसण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे.
- दिलीप जगताप, आसनगाव

रेल्वेकडून करण्यात आलेला हा प्रयोग जरी योग्य असला तरी प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेने गर्दीतला प्रवास चांगला करण्यासाठी वेगळी उपाययोजना करावी.
- अनिल श्रीवास्तव, टिटवाळा

कमी अंतरासाठी ही लोकल चालवणे शक्य होईल. मात्र लांबच्या अंतरासाठी ते शक्य नाही. खूपच मनस्ताप होईल.
- नितीन गमरे, टिटवाळा

Web Title: Now spread the legs and travel in the local!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.