Join us

आता राज्य निवडणूक विभाग सामान्य प्रशासनाची शाखा; फडणवीस सरकारचा निर्णय रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 2:35 AM

राज्य निवडणूक विभाग स्वतंत्र करण्याचा व निवडणूक शाखेसाठी १२८ पदे निर्माण करण्याबाबत १४ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय काढला.

मुंबई : राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणण्यात यावे असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य निवडणूक विभाग स्वतंत्र करण्याचा व निवडणूक शाखेसाठी १२८ पदे निर्माण करण्याबाबत १४ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय काढला. मात्र, भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक कार्यालयात नव्याने पद निर्माण करण्याचे निर्देश असून नवीन विभाग निर्माण करण्याचे निर्देश नाहीत तसेच असा प्रस्तावही सादर केलेला नाही. त्यामुळे स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग निर्माण करण्यास दिलेली मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विभागासाठी १.०२ कोटी रुपये खर्चास दिलेली मंजुरीही रद्द केली. यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील ३३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्य निवडणूक विभागात कायम स्वरुपी केलेले समावेशन देखील रद्द केले आहे.

टॅग्स :राज्य सरकारनिवडणूक