आता विमान कर्मचाऱ्यांसाठी  नवी नियमावली, काय आहेत नवे नियम? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:54 AM2022-04-11T07:54:24+5:302022-04-11T07:54:51+5:30

हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) हवाई प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी सुधारणा करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत.

Now the new rules for flight attendants what are the new rules Read here | आता विमान कर्मचाऱ्यांसाठी  नवी नियमावली, काय आहेत नवे नियम? वाचा...

आता विमान कर्मचाऱ्यांसाठी  नवी नियमावली, काय आहेत नवे नियम? वाचा...

Next

मुंबई :

हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) हवाई प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी सुधारणा करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विमान कर्मचाऱ्यांच्या ‘फिटनेस’संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

त्यानुसार गर्भधारणा, दुखापत किंवा शस्त्रक्रिया, मूत्रपिंड किंवा पित्ताशयातील खड्यांवर उपचार, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हृदयाची असामान्य हालचाल, कोणत्याही औषधांचा नियमित वापर, मद्यपान किंवा तत्सम पदार्थांचे सेवन आणि कोणत्याही असामान्य आजारासाठी केलेल्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात विमान कंपनीला तत्काळ महिती देण्यात यावी.

आरोग्य तपासणी होणार
- विमान कंपनीकडून ती डीजीसीएच्या वैद्यकीय पथकाला पाठविली जाईल. 
- आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय पथक संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करील. 
- शिवाय सलग १५ दिवस गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असेही नियमावलीत म्हटले आहे. 
- विमानात प्रत्यक्ष सेवा देणाऱ्यांकरिता ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

Web Title: Now the new rules for flight attendants what are the new rules Read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.