Join us

आता आराखडा ‘क्लायमेट स्किल’चा; विद्यार्थ्यांसाठी नवे कौशल्य प्रशिक्षण; ब्रिटिश कौन्सिलच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:54 IST

महाविद्यालयीने विद्यार्थ्यांना हवामान बदलाविषयी प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसित करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलमार्फत ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया, व्हियतनाम आणि भारतात ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’ राबविला जातो. ब्रिटिश कौन्सिलने संपूर्ण देशातून तीन संस्थांची निवड केली आहे.

मुंबई :  हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि परिणामांचा सामना करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलकडून क्लायमेट स्किल प्रोग्रॅमअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या १२०० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, तसेच २२५ ट्रेनर्सनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १३० ठिकाणी हवामान बदलाच्या संदर्भातील स्थानिक समस्यांचे निराकारण करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा विद्यापीठ ठरवणार आहे.

महाविद्यालयीने विद्यार्थ्यांना हवामान बदलाविषयी प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसित करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलमार्फत ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया, व्हियतनाम आणि भारतात ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’ राबविला जातो. ब्रिटिश कौन्सिलने संपूर्ण देशातून तीन संस्थांची निवड केली आहे.

संस्थांनाही प्रशिक्षणात करणार सहभागीस्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय आणि सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यामध्ये पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणे, पाणथळ भूमी संवर्धन, एनर्जी ऑडिट, असे उपक्रम राबविण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली. 

या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात २५ मास्टर ट्रेनर्स निवडले गेले आहेत. त्यांचे प्रशिक्षण २२ ते २६ मार्चदरम्यान विद्यापीठाने आयोजित केले आहे. या ट्रेनर्सना ब्रिटिश कौन्सिलच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षित केले जाणार आहे. टेनर्समध्ये मुंबई विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि संशोधकांचा समावेश आहे. 

७ जिल्ह्यांत उपक्रम राबवण्याचे उद्दीष्टया क्लायमेट स्कील प्रोग्रामअंतर्गत युवकांमध्ये हवामान बदलांबाबत जाणीव निर्माण करण्याबरोबरच हवामान बदलाचे दुष्परिणाम आणि त्याची दाहकता कशी कमी करता येईल, यावर भर दिला जाणार आहे.या प्रकल्पाअंतर्गत ब्रिटिश कौन्सिलकडून १३० प्रशिक्षक आणि ८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाने या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सात जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांनाही उपक्रमात सहभागी करून घेतले आहे.  

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी