आता ‘ते’ दिवस सुसह्य होतील !
By admin | Published: April 19, 2017 11:34 PM2017-04-19T23:34:58+5:302017-04-19T23:34:58+5:30
स्त्रीत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे मासिक धर्म होय. शाळेत शिकताना, उमलत्या वयात जेव्हा पाळी येणे ही एक प्रत्येक महिन्यातली डोकेदुखीच बनून जाते.
Next
मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - स्त्रीत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे मासिक धर्म होय. शाळेत शिकताना, उमलत्या वयात जेव्हा पाळी येणे ही एक प्रत्येक महिन्यातली डोकेदुखीच बनून जाते. एकदा पाळी आली कि ती पुढच्या महिन्यात नियमित वेळेला येईलच असे नाही. त्यामुळे कित्तेक जणींकडे सॅनिटरी पॅडही नसते. त्यातही प्रत्येकीने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्वाचे असते. हीच बाब हेरून वर्सोवा येथील आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी एक मोलाचे पाऊल उचलले आहे.
वर्सोवा, यारी रोड येथील चिल्ड्रेन वेल्फेर सेन्टर हाय स्कूल आणि क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन बसवायचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवार दि,२१ एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे, जेष्ठ पत्रकार राही भिडे,मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड, लिलावती हॉस्पिटल आणि रीसर्च सेंटरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा अगरवाल, संगीत दिग्दर्शिका, साकेत हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता दिघे,प्राचार्य अजय कौल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत
"डॉटर्स ऑफ वर्सोवा" नामक या मोहिमेसाठी कॉम्फी पॅड्स, "ती" फाऊंडेशन यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या अभियानांतर्गत ज्या ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय आहे अशा सार्वजनिक ठिकाणी या मध्ये ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड व्हेंडिंग एटीएम मशीन्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिलांना प्रिपेड स्मार्ट कार्ड दिले जाणार असून त्याचा वापर नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स मधून काढण्यासाठी केला जाणार आहे. त्याच बरोबर सॅनिटरी पॅड्स ची विल्हेवाट हीसुद्धा गंभीर आरोग्य विषयक समस्या बनली आहे त्यावर तोडगा म्हणून नॅपकिन डिस्पोझल मशीन्ससुद्धा बसवण्यात येतील अशी माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी दिली.
काही धक्कादायक आकडेवारी:
अज्ञान :
मासिक धर्मामध्ये गर्भाशयातून रक्तस्त्राव होतो ही बाब ६० % मुलींना माहिती नसते.
तर ३३ % मुलींना पाळी येण्यापूर्वी मासिक धर्माबाबत माहिती नसते.
जुन्या परंपरा:
पाळीच्या दिवसात मुलीं आणि महिलांना " अपवित्र" मनाला जात. त्यांना धार्मिक सण-समारंभात प्रवेश निषिद्ध समाजाला जातो. ७० % महिलांना वाटते कि मासिक रक्तस्त्राव घाणेरडे रक्त शरीराबाहेर उत्सर्जित करत.
अस्वच्छ साधनांचा वापर:
८० % महिला या काळात वापरलेले कपडे, पेपर्स, सुकलेली झाडाची पाने आदींचा वापर सॅनिटरी पॅड्स म्हणून करतात.