आता अॅप शोधणार शौचालयाची वाट
By admin | Published: January 10, 2017 07:14 AM2017-01-10T07:14:26+5:302017-01-10T07:14:26+5:30
मुंबईत सार्वजनिक शौचालयांची संख्या अल्प असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. कित्येक वेळा
मुंबई : मुंबईत सार्वजनिक शौचालयांची संख्या अल्प असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. कित्येक वेळा तर ही मोजकी शौचालये शोधतानाही नागरिकांची दमछाक होते. मात्र महापालिकेच्या मुंबई टॉयलेट लोकेटर अॅपमुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातील शौचालय शोधणे सोपे होणार आहे.
मुंबई शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची संख्या अल्प आहे. मात्र हे शहर जागतिक दर्जाचे असल्याने येथे दररोज लाखो लोकांची वर्दळ असते. यात पर्यटकही असंख्य असतात. मात्र शौचालयाअभावी त्यांची गैरसोय होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत नवीन सार्वजनिक शौचालये बांधण्यात येत आहेत. मुंबईतील ८०० सशुल्क सार्वजनिक शौचालये या
अॅपला जोडण्यात आली आहेत. तसेच इतरही सार्वजनिक शौचालये या अॅपला जोडण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)