Join us

पॉलिटेक्निकमध्ये आता सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:42 AM

विद्यार्थ्यांना अधिक कुशल करण्यासाठी आता बीजगणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासोबतच पर्यावरण तसेच भारतीय परंपरा असे सॉफ्ट स्किलचे विषयही शिकवले जाणार आहेत.

मुंबई : इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण देणाऱ्या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना अधिक कुशल करण्यासाठी आता बीजगणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासोबतच पर्यावरण तसेच भारतीय परंपरा असे सॉफ्ट स्किलचे विषयही शिकवले जाणार आहेत.डिप्लोमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण विज्ञान, भारतीय ज्ञान आणि परंपरा आणि भारतीय संविधान हे विषय प्रत्येकी दोन तास शिकविले जातील. याला कोणतेही क्रेडिट नसले तरी विद्यार्थ्यांनी हे शिकणे आवश्यक असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना मिळणाºया गुणांचे ग्रेडमध्ये रूपांतर होईल्, त्यांना गुणपत्रिकाही ग्रेडमध्ये मिळेल. जगभरातील विविध ग्रेड प्रणालीचा अभ्यास करून ही प्रणाली तयार करण्यात आल्याचे परिषदेने त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केले आहे.