पाइपलाइनवर आता ‘वॉच टॉवर’, मुंबईबाहेर पालिका करणार टेहळणी; कॅमेरे बसविण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:48 AM2023-11-26T10:48:00+5:302023-11-26T10:48:18+5:30

Mumbai News: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे जाळे आहे. या जलवाहिन्या जंगल परिसर, दुर्गम तथा ग्रामीण भागातून आणि भिवंडी, ठाणे खाडीतून विस्तारत मुंबईच्या दिशेने अंथरलेल्या आहेत.

Now 'watch tower' on the pipeline, the municipality will monitor outside Mumbai; The decision to install cameras | पाइपलाइनवर आता ‘वॉच टॉवर’, मुंबईबाहेर पालिका करणार टेहळणी; कॅमेरे बसविण्याचा निर्णय

पाइपलाइनवर आता ‘वॉच टॉवर’, मुंबईबाहेर पालिका करणार टेहळणी; कॅमेरे बसविण्याचा निर्णय

 मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे जाळे आहे. या जलवाहिन्या जंगल परिसर, दुर्गम तथा ग्रामीण भागातून आणि भिवंडी, ठाणे खाडीतून विस्तारत मुंबईच्या दिशेने अंथरलेल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईबाहेरील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शिवाय या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच आता जलवाहिनींभोवती टेहळणी स्तंभ (वॉच टॉवर) उभारण्याचाही निर्णय ही पालिकेने घेतला आहे. यामुळे जलवाहिन्या भोवतीच्या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने नजर ठेवणे सहज शक्य होणार आहे.

मुंबई महानगराला अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांतून दररोज सुमारे ३९०० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. 

...म्हणून ‘वॉच टॉवर’ उभारणार
महापालिकेच्या या जलवाहिनींची जंगल परिसरात असून दर १५ किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या वतीने प्रेशर मॉनिटरिंग केले जात असून, त्या ठिकाणी ही प्रेशर मॉनिटरिंग चौकी असते.  त्यामुळे या जलवाहिनींच्या सभोवती गस्त घालून जलवाहिनीतील पाण्याचा दाब तपासून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. 
त्यामुळे जंगल परिसरातून या जलवाहिनी जात असल्याने त्या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करणे शक्य नसल्याने या प्रेशर मॉनिटरिंग चौकीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून याच ठिकाणी टेहळणी स्तंभ अर्थात वॉच टॉवर बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

माती तपासणार 
पालिकेच्या जलवाहिन्यांसाठी वॉच टॉवर उभारणीसाठी फ्रेम स्ट्रक्ट कन्सल्टिंग इंजिनिअर्स एलएलपी यांची नेमणूक झाली आहे. नवीन टेहळणी स्तंभाच्या पायाचे बांधकाम करण्यापूर्वी जमिनीतील मातीची तपासणी होणार आहे. या तांत्रिक सल्लागाराच्या अहवालानुसार सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसविले जावे, याचा पुढील निर्णय घेत कार्य जाणार असल्याचे जल अभियंता विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Now 'watch tower' on the pipeline, the municipality will monitor outside Mumbai; The decision to install cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.