Join us

आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:06 AM

मुंबई : डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम ...

मुंबई : डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.

कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. आजच्या निर्णयामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत.

रेस्टॉरंट आणि बार पुढील लेव्हलनुसार निर्बंध शिथिल होईल, अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे. पण प्रशासनाचे असे निर्णय येत आहेत. हॉटेल रेस्टॉरंट क्षेत्राला कर्ज आणि नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ५० टक्के क्षमतेसह सुरू करू द्यावे, अशी विनंती हॉटेल चालकांनी पालिकेला केली आहे.

................................

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद ठेवून पार्सल सेवा आहे. पण त्यातून वीजबिल, भाडे, परवाना शुल्क, ईएमआयचा प्रश्न आहे. हॉटेल व्यवसायावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. हॉटेल बंद पडल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाईल. हॉटेल व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने दिलासा पॅकेज द्यावे.

- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष आहार

..................................

सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे कामगारांना परत आणले होते. पण आता निर्बंधांमुळे फटका बसणार आहे. आता इतका खर्च करून कामगारांना आणले आहे. निर्बंधांमुळे कमी कामगार ठेवावे लागतील. उर्वरित कामगारांना परत कसे पाठवायचे, हा प्रश्न आहे.

प्रीतम करकेरा, हॉटेलचालक

..................................................

मला औषधे आणि इतर खर्च आहे, पण लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने आर्थिक अडचण आली. काम बंद झाल्यास तो खर्च जुळवताना तारेवरची कसरत करावी लागते.

- सदानंद शेटीगार, कामगार

..................................................................

मी डोंबिवली येथून येतो, प्रवासाला निर्बंध असल्याने रेल्वे प्रवास करता येत नाही. गाड्या बदलत याव्या लागतात, वाहतूककोंडीमध्ये पाच ते सहा तास जातात. तसेच ते खूप खर्चीकही आहे.

- दिलीप कदम, कामगार