Join us

आता इंटरसिटी एक्स्प्रेस पूश-पूल इंजीनविना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:56 AM

निर्णयाची अंमलबजावणी २१ नोव्हेंबरपासून सुरू

मुंबई : दररोज विलंबाने इच्छित स्थळी पोहोचणे, घाट भागातील रखडलेले काम यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसला जोडलेले पूश-पूल इंजीन काढण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २१ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन जोडून एक्स्प्रेसची क्षमता आणि वेग वाढविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इंजीन जोडल्यावरही या एक्स्प्रेसला इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी २५ ते ५० मिनिटांचा उशीर होत होता. कर्जत थांबा काढूनदेखील ती अवेळी पोहोचत होती. परिणामी मध्य रेल्वेने पूश-पूल इंजीन काढण्याचा निर्णय घेतला असून २१ नोव्हेंबरपासून इंटरसिटी एक्स्प्रेस पूश-पूल इंजीनविना धावू लागली आहे.कर्जत थांबा मिळणार, प्रवाशांना दिलासाइंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल जोडण्याचा आणि आता हे इंजीन काढण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आता इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत थांबा मिळणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती सदस्य नितीन परमार यांनी दिली.अशी आहे वेळइंटरसिटी एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सकाळी ६.४० वाजता सुटेल, तर पुणे स्थानकात ती सकाळी ९.५७ वाजता पोहोचेल. पुणे स्थानकातून सायंकाळी ५.५५ वाजता एक्स्प्रेस सुटेल आणि सीएसएमटी स्थानकात रात्री ९.०५ वाजता पोहोचेल.