महिला दिन विशेष : आता महिलाही करणार एसटीचे सारथ्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:27 AM2021-03-08T02:27:08+5:302021-03-08T02:27:53+5:30

एसटीत सध्या ४,५०० महिला वाहक आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करतील. महिला चालकांची भरती प्रक्रिया साधारण २०१९ मध्ये सुरू झाली

Now women will also ride ST! | महिला दिन विशेष : आता महिलाही करणार एसटीचे सारथ्य!

महिला दिन विशेष : आता महिलाही करणार एसटीचे सारथ्य!

Next

नितीन जगताप

मुंबई : एसटीत २१५ महिलांच्या चालक-वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. यात आदिवासी भागातील २१ महिला आहेत. एसटीत चालक-वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती हाेईल. प्रशिक्षण सुरू झाले असून वर्षभरानंतर त्या सेवेत दाखल होतील, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

एसटीत सध्या ४,५०० महिला वाहक आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करतील. महिला चालकांची भरती प्रक्रिया साधारण २०१९ मध्ये सुरू झाली. 

काेरोनामुळे प्रशिक्षण थांबले
nशिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणी घेतल्यानंतरच या महिला चालक २०२१ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते; परंतु मधल्या काळात काेरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण थांबले हाेते. आता हे प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. 
nवर्षभरात त्या सेवेत दाखल होतील. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे मोठे चाचणी पथक असून तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.

Web Title: Now women will also ride ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.