Best Bus Seat Booking: मुंबईकरांनो! आता बेस्ट बसमध्येही सीट आरक्षित करता येणार; तीन महिन्यांत सुरु होणार नवीन सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:15 PM2022-02-11T19:15:07+5:302022-02-11T19:15:40+5:30

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सुमारे २८ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र सकाळच्या वेळेत बसगाड्या प्रवाशांनी भरुन जात असल्याने अनेकांची गैरसोय होत असते.

Now you can also make reservations in Best Bus; The new service will be launched in three months | Best Bus Seat Booking: मुंबईकरांनो! आता बेस्ट बसमध्येही सीट आरक्षित करता येणार; तीन महिन्यांत सुरु होणार नवीन सेवा 

Best Bus Seat Booking: मुंबईकरांनो! आता बेस्ट बसमध्येही सीट आरक्षित करता येणार; तीन महिन्यांत सुरु होणार नवीन सेवा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - खासगी वाहनांच्या धर्तीवर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्येही आसन आरक्षित करता येणार आहेत. ही सुविधा सध्याच्या ‘चलो अ‍ॅप’द्वारे मिळेल अथवा त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप आणण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून बसचा मार्ग, वेळ समजताच त्यातील आसन आरक्षित करण्याची सोय उपक्रमाकडून प्रवाशांना उपलब्ध केली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवाशांना ही सेवा उपलब्ध होणार आहे.  

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सुमारे २८ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र सकाळच्या वेळेत बसगाड्या प्रवाशांनी भरुन जात असल्याने अनेकांची गैरसोय होत असते. सकाळी कार्यालय गाठण्याची धावपळ असल्याने काहीजण ओला, उबेर, खासगी टॅक्सी, शेअर रिक्षाने प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी खासगी वाहनांच्या धर्तीवर बेस्ट बसमध्येही आपले आसन आरक्षित करण्याची योजना प्रशासन आणणार आहे. त्यासाठी सध्याच्या अ‍ॅपमध्ये बदल करून किंवा स्वतंत्र अ‍ॅपद्वारे आसन आरक्षित करण्याची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, त्या मार्गावर आणखी किती बससेवा असतील, याची माहिती मिळू शकेल.

खासगी टॅक्सी कंपन्यांप्रमाणेच ही सेवा उपलब्ध होणार असून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे. या सेवांमध्ये फक्त वातानुकूलित बस चालवण्यात येणार आहेत. यासाठी नियोजन सुरु असून ही योजना प्रवाशांच्या वेळेची बचत करणारी ठरेल, असा दावा बेस्ट प्रशासन करीत आहे. मात्र या बसमधून आसन आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

या बसचे भाडे सध्याच्या वातानुकूलित बसपेक्षाही अधिक असणार आहे. मात्र कोणत्या मार्गावर या बसगाड्यांना प्रतिसाद मिळेल, त्याचे भाडेदर किती असावे? याचे नियोजन करण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमाकडे तीन हजार ४६० बसचा ताफा आहे. यामध्ये मालकीच्या १९०६ आणि भाडेतत्त्वावरील १५४४ बसगाड्या आहेत. तर वातानुकूलित १४४० आणि विनावातानुकूलित २०२० बस आहेत. 

 

सुपर सेव्हर योजना

 

 प्रवाशांनी दैनंदिन तिकीट किती रुपये असते? त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर बचत योजना उपलब्ध होणार आहे. 

तिकिटाचे दर.... फेऱ्या(दरमहा).... योजने अंतर्गत दर 

 

(आडकेवारी रुपयांमध्ये )

पाच  – ५० फे-या - १९९

१० - ५० फे-या - ३९९ 

१५ - १०० फे-या ... ७४९ 

 

विद्यार्थी पास  

महिना  – २००  रुपये

त्रैमासिक  – ६०० रुपये

Web Title: Now you can also make reservations in Best Bus; The new service will be launched in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट