"आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खोके कुणी पुरवले असतील? हॉटेल कुणी बूक केलं असेल?" उद्धव ठाकरे यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 06:00 PM2023-12-16T18:00:49+5:302023-12-16T18:02:04+5:30

"आपले सरकार असताना आपण, तुम्ही सांगा अडीच वर्षांच्या काळात, आपण कधी तरी धारावीचा गळा घोटू असा एक तरी जीआर काढला का? मग ते जे म्हणतायत 2018 साल, तेव्हा आम्ही नव्हतोच , तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्यामुळे पाप कुणाचं असेल, तर ते देवेंद्र यांचं आहे."

Now you realize who would have provided the boxes And who would have booked the hotel Uddhav Thackeray attack on state government over Dharavi Redevelopment issue and gautam adani | "आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खोके कुणी पुरवले असतील? हॉटेल कुणी बूक केलं असेल?" उद्धव ठाकरे यांचा निशाणा

"आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खोके कुणी पुरवले असतील? हॉटेल कुणी बूक केलं असेल?" उद्धव ठाकरे यांचा निशाणा

यांना जर वाटत असेल, की सब भमी गोपाल की, तशी सब भूमी अदानीकी, तर असे अजिबात होऊ देणार नाही. आता तुमच्या लक्षात आले असेल की, अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार, गद्दारी करून यांनी पाडले, ते खोके कुणी पुरवले असतील? आता तुम्हाला लक्षात आले अलेल, खोके कुणाकडून गेले असतील? विमान कुणी पुरवले असेल? हॉटेल बुकिंग कुणी केले असतील? मुळात सरकार पाडण्याचे कारण आता तुम्हाला कळले असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ते धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाकडे देण्याच्या निर्णयाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करत होते.

ठाकरे म्हणाले,  "आज माझ्यासोबत सर्व पक्ष एकवटले आहेत. पण ज्या-ज्या वेळी मुंबईवर संकट आले, मग ते 1992-93 सालच्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असतील, पूर असेल, काहीही असले, करोना होता. तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक. सर्व पक्ष माझ्यासोबत असतात. पण त्यांना जेव्हा कळले की, जोवर बसलेला आहे, तोवर मला मुंबई गिळता येणार नाही. मग हे सर्व कट कारस्थान तर शिजवले नाही ना, असा प्रश्न माझ्या मनात येतो. हे सर्व खोके, खोके सरकार, पन्नास खोके एकदम ओके, कशासाठी? कुणासाठी? कुणी दिले? हे आता उघडकीस आले आहे." 

"आपले सरकार असताना आपण, तुम्ही सांगा अडीच वर्षांच्या काळात, आपण कधी तरी धारावीचा गळा घोटू असा एक तरी जीआर काढला का? मग ते जे म्हणतायत 2018 साल, तेव्हा आम्ही नव्हतोच , तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्यामुळे पाप कुणाचं असेल, तर ते देवेंद्र यांचं आहे. पण आज जी आवई उठवली जाते, की शिवसेना ही विकासाच्या विरोधात आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पन्नास खोके एकदम ओकेवर पुन्हा एकदा भाष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, "आता यांना पंन्नास खोके कमी पडायला लागले आहेत. म्हणू हे धारावी गिळायला निघाले आहे. यांना पन्नास खोके कमी पडत आहेत. म्हणून यांची मस्ती वाढत चालली आहे. हे असंवेधानिक सरकार आहे. यांना वाटतंय की आपल्याला कुणी जाब विचारू शकत नाही."
 

Web Title: Now you realize who would have provided the boxes And who would have booked the hotel Uddhav Thackeray attack on state government over Dharavi Redevelopment issue and gautam adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.