पाली येथे पडला एनएसएसचा ‘प्रकाश’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:13 AM2019-11-26T03:13:25+5:302019-11-26T03:14:29+5:30

कांदिवलीच्या प्रकाश कॉलेजचा एनएसएस कॅम्प नुकताच पाली (रायगड) येथील वावळोली या गावी पार पडला. १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पच्या माध्यमातून वावळोली गावात कॉलेजियन्सच्या समाजकार्याचा ‘प्रकाश’ पडला असेच म्हणावे लागेल.

NSS 'Prakash' falls in Pali | पाली येथे पडला एनएसएसचा ‘प्रकाश’

पाली येथे पडला एनएसएसचा ‘प्रकाश’

Next

- रोहित नाईक
कांदिवलीच्या प्रकाश कॉलेजचा एनएसएस कॅम्प नुकताच पाली (रायगड) येथील वावळोली या गावी पार पडला. १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पच्या माध्यमातून वावळोली गावात कॉलेजियन्सच्या समाजकार्याचा ‘प्रकाश’ पडला असेच म्हणावे लागेल. एकूण ५० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभलेल्या या कॅम्पमध्ये एनएसएस विभागप्रमुख प्रा. संजय रावल आणि प्राचार्या धनश्री मोटा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम पार पाडले.

सात दिवस विद्यार्थ्यांचा मुक्काम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत असल्याने कॉलेजियन्सना कॅम्पदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा आणि त्यांच्यासह अनेक उपक्रम राबविण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे, नेहमी माती, धूळ यापासून लांब पळणारी तरुणाई या कॅम्पमध्ये मात्र सहजपणे मातीत काम करताना पाहण्यास मिळाली. वाढलेले गवत कापणे, रस्ता सपाटीकरण करणे, आश्रमशाळेचा कॅम्पस ठीक करणे याशिवाय साफसफाई आणि प्रसाधनगृहांची स्वच्छता अशी कामेही प्रकाश कॉलेजच्या या एनएसएस वॉलेंटिअर्सने कोणत्याही अडचणींविना पूर्ण केली.
केवळ श्रमदानच नाही, तर अनेक सामाजिक उपक्रम राबवून या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर गावामध्ये जनजागृतीही केली. यामध्ये सर्वात प्रभावी विषय ठरला तो व्यसनमुक्ती जनजागृती संदेश. महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी मंडळाच्या साहाय्याने काम करताना प्रकाश कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढताना गावकऱ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला. त्याचबरोबर आकर्षक पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करून व्यसनामुळे होणाºया दुष्परिणामावरही एनएसएसने ‘प्रकाश’ टाकला. याव्यतिरिक्त एचआयव्ही एड्स, महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत अभियान या विषयांवरील उपक्रमही विशेष लक्षवेधी ठरले. तसेच दात्री संस्थेच्या वतीने एनएसएसने या वेळी गावकऱ्यांना ब्लड स्टेम सेल डोनेशनचे महत्त्वही पटवून दिले.
कॅम्पदरम्यानच आलेला बालदिन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला. बालदिनानिमित्त प्रकाश कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष खेळांचे आयोजन केले होते. तसेच या मुलांना शालोपयोगी वस्तूंची भेटही दिली. या कॅम्पमधून आम्हाला टीमवर्क, लीडरशिप आणि अनेक व्यक्तिमत्त्व विकासाच्या गोष्टी शिकता आल्या. सर्वात महत्त्वाचे स्वावलंबी राहण्याची शिकवण मिळाली, अशी प्रतिक्रिया एनएसएस वॉलेंटिअर्सकडून मिळाली. काजोल बर्नवाल आणि क्रिष्णा ठाकूर यांना एफवायमधून, तर सलोनी दलाल आणि अंकित विश्वकर्मा यांना एसवायमधून सर्वोत्तम वॉलेंटिअर्स म्हणून निवडण्यात आले.
 

 

Web Title: NSS 'Prakash' falls in Pali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई