- सागर नेवरेकरमुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या संचलनाप्रमाणेच शिवाजी पार्कही या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज होत असून, या वेळी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) या महाविद्यालयीन स्तरावर सामाजिक कार्य करणा-या गटाची सलामी विशेष ठरणार आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील निवडक विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून, ‘स्टेट रिपब्लिक डे परेड कॅम्प २०२०’ या कॅम्प अंतर्गत सध्या या सर्वांचे सराव शिबिर मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सुरू आहे.एकूण ८६ एनएसएस विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या शिबिरामध्ये ४३ मुले आणि ४३ मुलींचा सहभाग आहे. प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाºया संचलनामध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा शुभम डुंबरे महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. त्याचवेळी, मुंबई विद्यापीठाची वेदिका जोगळे आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्याच श्रद्धा गायकवाड यांची कंटिजन्ट कमांडर म्हणून निवड झाली आहे.एनएसएसच्या माजी राज्य संपर्क अधिकारी निलोफर अहमद यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या एसआरडी कॅम्पचे यंदाचे १८ वे वर्ष आहे. या शिबिरादरम्यान दररोज तीन सत्रांमध्ये परेडचा सराव होतो. याशिवाय रस्ता सुरक्षा, अवयवदान, एचआयव्ही-एड्स, नेतृत्वगुण अशा विविध विषयांवर चर्चासत्रेही आयोजित केली जात आहेत. सुशील शिंदे व प्रतिभा चिपळूणकर या शिबिराचे समन्वयक असून जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. सतीश कोलटे व निखिल कारखानीस हे जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच, परेड सल्लागारम्हणून विद्यार्थ्यांना डी. जी. फोंडेकर यांचे मार्गदर्शन मिळत असून, कॅम्प डायरेक्टर सुधीर पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पारपडत आहे.या विद्यापीठांचा संचलनात समावेशमुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे), राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), एसएनडीटी (मुंबई), पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ (सोलापूर), भारती विद्यापीठ (पुणे), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), प्लस टू संचालनालय (पुणे), महाराष्ट्र पशू-मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर), महाराष्ट्र युनिट आॅफ हेल्थ अॅण्ड सायन्स (नाशिक), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक), कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), गोंडवाना विद्यापीठ आणि परभणी विद्यापीठ.मी मुंबईत पहिल्यांदा आलो. याआधीही मी कमांडिंगचा अनुभव घेतलेला आहे. भारतीय सेनादलात सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे. शिक्षक तसेच सिनियर्स आपल्यावर का ओरडतात, हे यानिमित्ताने समजले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना वॉलेंटिअर्सना नियंत्रणात ठेवणे आव्हानच असते. एनएसएसमधून नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास, स्टेज डेरिंग अशा गोष्टी आत्मसात होतात.- शुभम डुंबरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेकंटीजन कमांडरसाठी माझी निवड झाल्याने खूप खूश आहे. एनएसएसमध्ये सहभागी होताना एसआरडीची कल्पना होती. माझ्या महाविद्यालयातून मी पहिली कंटीजन कमांडर असल्याचा अभिमान आहे. घरच्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत मजल मारता आली.- वेदिका जोगळे, एसआयईएस महाविद्यालय, सायन (पूर्व)पुणे आणि मुंबईचे वातावरण एकसारखे जाणवले. वरळी-वांद्रे सी-लिंकचा घेतलेला अनुभव मस्त होता. कंडीजन कमांडरसाठी निवड होण्याचा विश्वास होता. त्यासाठी खूप मेहनतही घेतली होती. इथे राज्यभरातून विद्यार्थी आलेले असून मला जळगावची भाषा खूपच आवडली. एसआरडीमधील शिक्षक व सिनीयर्स खूप सहकार्य करतात. कंटीजन कमांडरसाठी निवड झाल्याचे अजून घरच्यांना सांगितले नाही. त्यांच्यासाठी हा सुखद धक्का असेल.- श्रद्धा गायकवाड,सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
प्रजासत्ताक दिनी एनएसएसची सलामी, शिवाजी पार्कवर रंगणार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 2:27 AM