सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून ५२५ मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 09:34 PM2022-04-16T21:34:33+5:302022-04-16T21:35:28+5:30

सोलापूर येथील एनटीपीसी वीजनिर्मिती केंद्राकडून आणखी ५२५ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे.

ntpc center in solapur starts generating 525 MW power | सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून ५२५ मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून ५२५ मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

googlenewsNext

मुंबई: वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत आहे. त्यानुसार सोलापूर येथील एनटीपीसी वीजनिर्मिती केंद्राकडून आणखी ५२५ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आज शनिवारीही (दि. १६)  सकाळी ७ वाजेनंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने विजेचे भारनियमन केले नाही.

विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने एनटीपीसीच्या सोलापूर, मौदा व गदरवारा या वीजनिर्मिती कंपन्यांकडून ६७३ मेगावॅटचा अतिरिक्त कोटा उपलब्ध करून घेतला आहे. तसेच दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी सोलापूर वीजनिर्मिती केंद्र यातील संच क्रमांक दोन तांत्रिक कारणास्तव बंद झाल्याने जवळपास ५२५ मेगावॅटची वीज कमी मिळत होती. यासंबंधी महावितरणने एनटीपीसीसोबत संपर्क साधून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याने सदर संच आज दि.१६ एप्रिल २०२२ रोजी कार्यान्वित झाली त्यामुळे आज या संचामधून ५२५ मेगावॅट विजेची उपलब्धता वाढली असल्यामुळे राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तथापि, मागील दोन दिवसांपासून खुल्या बाजारामधून (पॉवर एक्सचेंज) महावितरणकडून १५०० ते २००० मेगावॅट विजेची खरेदी करण्यात येत असल्यामुळे या शुक्रवार (१५ एप्रिल) व शनिवार (१६ एप्रिल) या दोन दिवसात राज्यात भारनियमन करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे रतन इंडिया (१२०० मेवॅ), साई वर्धा (२४० मेवॅ) व जीएमआर, वरोरा (२०० मेवॅ) इत्यादीकडून वीज करारानुसार वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मितीकडून करारीत ९५४० मेगावॅट औष्णिक क्षमतेपैकी ६८०० ते ७००० मेगावॅट तसेच एनटीपीसीकडून करारीत ५७३२ मेगावॅटपैकी ४४०० मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मिती व एनटीपीसीसोबत करारीत क्षमतेप्रमाणे वीज उपलब्ध होण्याकरिता देखील महावितरणकडून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. सदरची वीज उपलब्ध झाल्यास ग्राहकांना भारनियमनमुक्त  करणे शक्य होईल.
 

Web Title: ntpc center in solapur starts generating 525 MW power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.