Join us

अणुक्षेत्रातील संशोधनाला बळकटी मिळणार!; तीन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 4:00 AM

आपल्या व्यवहार्यतापूर्ण अभ्यासाने औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा विस्तार, सुरक्षिततेबाबतच्या मानकांचा वपर आणि अतिप्रगत प्रशिक्षण दृष्टिकोन यांना चालना देणे हे या तीन संस्थांचे उद्दिष्ट आहे.

मुंबई : नागरी अणुक्षेत्रात संस्थात्मक, औद्योगिक व शिक्षण, संशोधनात्मक पातळीवर बळकटी येण्यासाठी महाराष्ट्रात सेंटर आॅफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी भारत आणि फ्रान्समधील ईडीएफ, आय२ईएन आणि व्हीजेटीआय या संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षºया केल्या आहेत. आपल्या व्यवहार्यतापूर्ण अभ्यासाने औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा विस्तार, सुरक्षिततेबाबतच्या मानकांचा वपर आणि अतिप्रगत प्रशिक्षण दृष्टिकोन यांना चालना देणे हे या तीन संस्थांचे उद्दिष्ट आहे.जैतापूर प्रकल्पाची संरचना, प्रोक्युरमेंट, बांधकाम, कार्यान्वयन आणि परिचालनाशी निगडित सर्व कामांच्या संदर्भात आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हे या सेंटर आॅफ एक्सलन्सचे लक्ष्य असणार आहे. शिक्षण/संशोधन क्षेत्रातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भागधारकांचा या सेंटर आॅफ एक्सलन्समध्ये सहभाग असेल, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणारे विशेष अभ्यासक्रम आणि मोड्यूल्स हे प्रकल्पाशी संबंधित विविध निश्चित गरजा आणि प्रत्यक्ष कामकाजातील आवश्यकता संदर्भा$तील सर्व उत्तरे देण्यास सक्षम असतील, याची खातरजमा केली जाणार आहे. सेंटर आॅफ एक्सलन्सच्या माध्यमातून उत्तम प्राध्यापक, संशोधक आणि औद्योगिक तज्ज्ञांच्या माध्यमातून भारतातील या ईपीआर प्रकल्पाच्या विकासात सहभागी असलेल्या भारतीय कंपन्यांमधील अभियंते व तंत्रज्ञ तसेच पुरवठादारांना प्रशिक्षण देण्यात येईल.  जैतापूर प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात २५ हजार थेट रोजगारांसह कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच २०३५ सालापर्यंत प्रतिवर्षी ७५ टेरावॉट प्रति तासापर्यंत कार्बनमुक्त वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ कोटी घरांना पुरेल इतकी वीज पुरवली जाणार असून, प्रतिवर्षी ८ कोटी टन कार्बन उत्सर्जनाला आळा बसविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे असणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाश्वत प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी व्हीजेटीआय पूर्ण प्रयत्न करेल. तसेच व्हीजेटीआय ‘आत्मनिर्भर’ मोहिमेअंतर्गत भविष्यातील प्रकल्पांसाठी सुरक्षिततेवर विशेष भर देईल, असे व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांनी म्हटले आहे. २०३५ सालापर्यंत प्रतिवर्षी ७५ टेरावॉट कार्बनमुक्त वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ कोटी घरांना पुरेल इतकी वीज पुरवली जाणार आहे. कार्बन उत्सर्जनाला आळा बसविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे असणार आहे.यशस्वी अणू प्रकल्पासाठी प्रशिक्षण हा अत्यंत कळीचा घटक आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात, संबंधित कंपनीत तसेच भारतीय पुरवठा साखळीत रोजगार निर्मिती होऊन स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला गती मिळते. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आय२ईएन आपले योगदान देईल. - डॉ. हेन्री साफा,संचालक, आय२ईएन 

टॅग्स :मुंबई