राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ५० हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:52+5:302021-09-13T04:05:52+5:30

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ...

The number of active corona patients in the state is over 50,000 | राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ५० हजारांवर

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ५० हजारांवर

Next

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ९७ हजार ८७७ झाली आहे तर, दिवसभरात २ हजार ९७२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात ६३ लाख ५ हजार ७८८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या राज्यभरात सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४०० इतकी आहे.

राज्यात आज दिवसभरात ४६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. तर, आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार १४२ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५९ लाख ७९ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर, सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २०७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, १ हजार ८९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title: The number of active corona patients in the state is over 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.