Join us

राज्यात सक्रिय रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आता दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आता दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. राज्यात मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या खाली गेल्याचे दिसून आले आहे. सध्या २,३०,६८१ रुग्ण उपचाराधीन आहेत; तर दुसरीकडे दिवसभरात १४,१२३ रुग्णांचे निदान झाले असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ३५ हजार ९४९ आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५४,३१,३१९ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे; यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले आहे. दिवसभरात ४७७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांचा आकडा ९६ हजार १९८ आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.६७ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,६१,०१५ झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत; तर ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मंगळवारी नोंद झालेल्या ४७७ मृत्यूंमध्ये मुंबई २३, ठाणे २, नवी मुंबई ५, कल्याण-डोंबिवली महापालिका १, पालघर १७, वसई-विरार महापालिका ३१, रायगड २२, पनवेल महापालिका १, नाशिक २०, नाशिक महापालिका २१, मालेगाव मनपा २, अहमदनगर २६, अहमदनगर मनपा २, जळगाव २, जळगाव मनपा १, नंदुरबार ४, पुणे १५, पुणे मनपा ९, सोलापूर १६, सोलापूर मनपा १, सातारा २८, कोल्हापूर ३२, कोल्हापूर मनपा ८, सांगली १४, सांगली-मिरज कुपवाड मनपा ६, सिंधुदुर्ग १०, रत्नागिरी १६, औरंगाबाद मनपा १४, जालना १०, हिंगोली ३, परभणी ३, परभणी मनपा २, लातूर ५, लातूर मनपा ४, उस्मानाबाद ७, बीड २९, नांदेड ३, नांदेड मनपा २, अकोला २,अकोला मनपा २, अमरावती ४, यवतमाळ ६, बुलढाणा ६, वाशिम ६, नागपूर ३, नागपूर मनपा ५, वर्धा ४, भंडारा ३, चंद्रपूर ६, चंद्रपूर मनपा २, गडचिरोली ११, इ. रुग्णांचा समावेश आहे.