पनवेल : राज्यभरातील बहुतांश शहर व उपनगरांमध्ये रिक्षा व्यावसायिकांचे मीटर सुरू असून, त्यानुसार भाडे आकारले जात आहे. परंतु, पनवेल परिसरातील रिक्षा व्यावसायिक अजूनही मीटर न टाकता व्यवसाय करतात. याबाबत आंदोलन त्याचबरोबर कारवाई झाली तरी फारसा काही फरक पडत नाही. त्यामुळे आता या मनमानीवर बसची मात्रा देण्यात येणार आहे. याकरिता आरटीओकडून संबंधित परिवहन यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू झाला आहे.प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या पुढाकाराने पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, उलवे, उरण व तळोजा, खारघर या ठिकाणी बससेवा सुरू करण्याकरिता काही प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आले. या संदर्भात सविस्तर प्रस्ताव संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मानसरोवर, खांदेश्वर, मानसरोवर- रोडपाली खांदेश्वर- नवीन पनवेल या मार्गावर एनएमएमटीच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. रिक्षाचालकांकडून या सेवेला विरोध करण्यात आला. मात्र तो बऱ्यापैकी मोडून काढण्यास पोलिसांना यश मिळाले. सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी ठाम भूमिका घेतली. अरुण भिसे यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी सुध्दा एनएमएमटीकरिता दबाव गट तयार केला. त्यामुळे ही बससेवा सुरू राहिली. यापैकी बहुतांशी मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एनएमएमटीकडून सांगण्यात आले.नियमानुसार रिक्षामध्ये मीटर सुरू असणे बंधनकारक आहे. यातून पारदर्शक व्यवहाराला मदत होते आणि रिक्षा व्यावसायिक व प्रवाशांमधील वादही टाळता येतात. परंतु, सद्यस्थितीला पनवेल आणि सिडको वसाहतीत, शहरात काही रिक्षा व्यावसायिक प्रवाशांकडून भरमसाठ भाडे वसूल करतात. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना फसवतात. येथील बहुतांश रिक्षा व्यावसायिक शासनाचे सर्व कर भरण्याबरोबरच त्यांचे नियम व अटी पाळत आहेत. परंतु, मीटर शिवाय वाहतुकीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. काही रिक्षा व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रि या जाणून घेतली असता त्यांनी रिक्षा व्यवसाय परवडत नसल्याचे सांगितले. (वार्ताहर) पनवेल रिंगरूटसाठी आग्रहपनवेल नगरपालिकेची रिंगरूट बससेवा लवकरात लवकर चालू करावी याकरिता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याकरिता परिवहन विभागाने सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. याकरिता निविदा प्रक्रि या सुरू असून लवकरच या प्रकल्पाला गती येईल, असे पालिकेकडून आरटीओ कार्यालयाला कळविण्यात आले आहे.इतर ठिकाणीही बससेवापनवेल नगरपालिकेच्या बससेवेशिवाय तळोजा, उलवे, उरण, रोडपाली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली या ठिकाणी अंतर्गत बससेवा सुरू करण्याकरिता एनएमएमटीला प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच या मार्गावरही बससेवा सुरू होईल, असा आशावाद आरटीओकडून व्यक्त करण्यात आला आहे.बससेवा सुरू करण्यासंदर्भात संबंधित परिवहन यंत्रणांकडे प्रस्ताव दिले आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर तक्र ारी सुध्दा कमी होतील. काही ठिकाणी बससेवा सुरू करण्यास आम्हाला यशही आले आहे. लवकरच सगळीकडे बससेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे याकरिता नवी मुंबई पोलिसांचे चांगले सहकार्य लाभत आहे. - आनंद पाटील, उपपरिवहन अधिकारी
रिक्षाचालकांच्या मनमानीवर बसची मात्रा
By admin | Published: July 03, 2015 1:21 AM