राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:32+5:302021-05-29T04:06:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५३ ...

The number of corona-free patients in the state is higher than the number of diagnoses | राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५३ लाख ७ हजार ८७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे शुक्रवारी २० हजार ७४० रुग्ण आणि ४२४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२४ टक्के झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली गेली आहे. सध्या २ लाख ८९ हजार ८८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४३ लाख ५० हजार १८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.५७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २१ लाख ५४ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १६ हजार ७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात ५६ लाख ९२ हजार ९२० कोरोना बाधित असून, मृतांची संख्या ९३ हजार १९८ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.६४ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ४२४ मृत्यूंपैकी २९१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १३३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ४२४ मृत्यूंमध्ये मुंबई ३०, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ३, पालघर ३, वसई-विरार मनपा २, रायगड ७, पनवेल मनपा ३, नाशिक १०, नाशिक मनपा ९, अहमदनगर २१, अहमदनगर मनपा २, जळगाव १, जळगाव मनपा २, नंदूरबार १, पुणे २६, पुणे मनपा १५, सोलापूर ४०, सोलापूर मनपा १, सातारा २४, कोल्हापूर ३६, कोल्हापूर मनपा २, सांगली ३२, सांगली-मिरज-कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १०, रत्नागिरी १४, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ९, जालना ६, हिंगोली १, परभणी २, लातूर १२, लातूर मनपा ३, उस्मानाबाद १६, बीड १७, नांदेड ४, नांदेड मनपा २, अकोला १२, अकोला मनपा २, अमरावती ८, अमरावती मनपा २, यवतमाळ २, वाशिम ५, नागपूर २, नागपूर मनपा १०, वर्धा १, भंडारा १, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

राज्य

आजचा मृत्यूदर १.६४

आजचे मृत्यू ४२४

आजचे रुग्ण २०,७४०

सक्रिय रुग्ण २,८९,०८८

मुंबई

आजचा मृत्यूदर ३.२

आजचे मृत्यू ३०

आजचे रुग्ण ९२४

सक्रिय रुग्ण २८७९३

Web Title: The number of corona-free patients in the state is higher than the number of diagnoses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.