Coronavirus : विक्रोळीत कोरोना रुग्णांच्या संख्येत पडतेय भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:45 AM2020-04-29T01:45:27+5:302020-04-29T01:45:59+5:30

दरम्यान, कन्नमवार नगर व विक्रोळी गाव येथेही प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रुग्ण आढळलेले परिसर पालिकेने सील केले आहेत.

The number of corona patients in Vikhroli is increasing | Coronavirus : विक्रोळीत कोरोना रुग्णांच्या संख्येत पडतेय भर

Coronavirus : विक्रोळीत कोरोना रुग्णांच्या संख्येत पडतेय भर

Next

मुंबई : मुंबई विक्रोळी येथे आठ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी सहा रुग्ण हे विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील आहेत. टागोरनगर येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. या महिलेच्या संपर्कात हे सहा जण आले होते. या सहा जणांची चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५०हून अधिक जणांना हिरानंदानी येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे टागोरनगर परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, कन्नमवार नगर व विक्रोळी गाव येथेही प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रुग्ण आढळलेले परिसर पालिकेने सील केले आहेत.
>लोकमतच्या दि,२७ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘कांदिवली येथील कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या तरुणाची नोंद अद्याप नाही! आणि हलगर्जीपणा: आमदार अतुल भातखळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झालेली आहे. ही बातमी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे. याबाबतची वस्तुस्थिती महापालिकेच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आली असल्याचा खुलासा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे -पाटील यांनी केला आहे.
लोकमतच्या उपरोक्त माहितीवरून आमदार महोदयांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा गैरसमजातून हा आरोप त्यांनी केलेला दिसतो, असे मत पालिकेने आपल्या खुलाश्यात नमूद केले आहे.
दरम्यान, लोकमतमध्ये संबंधित वृत्त प्रसिद्ध झाल्यावर येथील आर दक्षिण वॉर्डने येथील नागरिकांची कोरोना चाचणी काल केल्याची माहिती येथील नागरिकांनी लोकमतला दिली.

Web Title: The number of corona patients in Vikhroli is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.