मुंबई : मुंबईत बुधवारी मागील काही दिवसांच्या रुग्णसंख्या निदानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. बुधवारी शहर उपनगरात १८३ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, त्यामुळे मुंबईची रुग्णसंख्या १ हजार ८९६ वर पोहोचली आहे. तर दोन मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ११४ वर पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संसर्ग वाढतो आहे.
मुंबईत बुधवारी बॉम्बे रुग्णालयात एकूण चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर भाटिया रुग्णालयाच्या आणखीन १० कर्मचाºयांना लागण झाल्याने एकूण रुग्णसंख्या ३५ झाली आहे. बॉम्बे रुग्णालयातील एक डॉक्टर पॉझीटीव्ह आल्याचे निदान झाल्यावर बुधवारी रुग्णालयातील १२० वैद्यकीय कर्मचाºयांची चाचणी झाली. या चाचणीमध्ये डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय सहाय्यकाचा समावेश आहे. त्यात झालेल्या चाचणीमध्ये रुग्णालयातील चार जणांच्या चाचण्या कोरोनासाठी पॉझीटीव्ह आल्या आहेत. भाटिया रुग्णालयातील आणखी दहा कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७० कर्मचाºयांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात २५ कर्मचाºयांना लागण झाल्याचे सामोर आले होते. आता पुन्हा आणखी १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.मुंबईतील एकूण कोरोना (कोविड-१९) रुग्णांपैकी ८५७ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि सर्वेक्षण अंतर्गत कोविड संशयित रुग्ण आढळले आहेत. याखेरीज, ५ ते १४ एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोविड रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु क?ण्यात आले आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या १०० क्लिनिकमध्ये ३ हजार ९२९ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी, १ हजार ५४१ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत.बुधवारी भरती झालेले २८१संशयित रुग्णएकूण भरती झालेले ५३७९संशयित रुग्णबुधवारी निदान १८३झालेले रुग्णएकूण पॉझिटिव्ह रुग्ण १८९६बुधवारी झालेल्या मृत ०२रुग्णांची नोंदएकूण मृतांची संख्या ११४मंगळवारी कोविडमधून १७मुक्त झालेले रुग्णकोविड आजारातून १८१मुक्त झालेले रुग्ण