लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एसटीतील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडाही सहा हजारांहून अधिक झाला आहे.
एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना काळात सेवा देताना राज्यातील एकूण ५,२३८ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तर ११८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ४५१७ कर्मचारी उपचार घेऊन कामावर आले. तर ६०३ एसटी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांची यामध्ये नोंद नसून हा आकडा सहा हजारांहून अधिक झाला आहे.
* निर्णयाचा फेरविचार व्हावा
काेराेना काळात एसटीच्या चालक, वाहकांच्या सुरक्षिततेची काळजी प्रशासनाकडून गाभीर्याने घेतली जात नाही. बेस्ट कामगिरी करून आपल्या गावी गेलेले कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह येत आहेत. मुंबईवरून कामगिरी करून गेलेल्या पाथरी आगाराच्या चाैघांना काेराेना झाला. बेस्ट सेवेसाठी एसटी कर्मचारी पाठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस,
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस
........................