रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:31+5:302021-05-05T04:08:31+5:30

दिवसभरात ४८ हजार ६२१ रुग्ण, ५७६ मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्ण ...

The number of cures is higher than the number of patients diagnosed | रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Next

दिवसभरात ४८ हजार ६२१ रुग्ण, ५७६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्ण व मृत्यूची संख्या कमी झाल्याचे दिसून आले, दुसरी सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात ४८ हजार ६२१ रुग्ण आणि ५७६ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. सध्या राज्यात ६ लाख ५६ हजार ८७० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७ टक्के झाले असून, मृत्युदर १.४९ टक्के आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४७ लाख ७१ हजार २२ झाली असून बळींचा आकडा ७० हजार ८५१ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७८ लाख ६४ हजार ४९१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २८ हजार ५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

..................................

Web Title: The number of cures is higher than the number of patients diagnosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.