Join us

राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:08 AM

रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिकदिवसभरात ४८ हजार ६२१ रुग्ण, ५६७ मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

दिवसभरात ४८ हजार ६२१ रुग्ण, ५६७ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्ण व मृत्यूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. दुसरी सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात ४८ हजार ६२१ रुग्ण आणि ५६७ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. सध्या राज्यात ६ लाख ५६ हजार ८७० रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७ टक्के झाले असून, मृत्यूदर १.४९ टक्के आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४७ लाख ७१ हजार २२ झाली असून, बळींचा आकडा ७० हजार ८५१ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७८ लाख ६४ हजार ४९१ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत, तर २८ हजार ५९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

..................................