राज्यात दैनंदिन काेराेना चाचण्यांचे प्रमाण एक लाखाहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:03+5:302021-03-26T04:07:03+5:30

आराेग्य विभाग; प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे १ लाख ४१ हजार चाचण्या स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या ...

The number of daily carina tests in the state is over one lakh | राज्यात दैनंदिन काेराेना चाचण्यांचे प्रमाण एक लाखाहून अधिक

राज्यात दैनंदिन काेराेना चाचण्यांचे प्रमाण एक लाखाहून अधिक

Next

आराेग्य विभाग; प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे १ लाख ४१ हजार चाचण्या

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांत राज्यातील रुग्णांचे प्रमाण तब्बल ६२.९१ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन चाचण्यांची क्षमता वाढविली असून, दररोज एक लाख किंवा त्याहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे १ लाख ४१ हजार ८५६ चाचण्या करण्यात येत आहे. मागील वर्षी ३१ मे रोजी हे प्रमाण केवळ ३ हजार ४१८ इतके होते. त्यानंतर चाचण्यांच्या संख्येत टप्प्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. राज्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून चाचण्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले. ४ मार्च रोजी ८५,७७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यांत ८,९९८ रुग्ण आढळले; तर १५ मार्च रोजी १ लाख ७ हजार ५३६ चाचण्या कऱण्यात आल्या; त्यात १६,६२० रुग्णांची नोंद झाली.

राज्यात गुरुवारी १ लाख २० हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, ३१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. संसर्ग नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून शोध, निदान, उपचारांवर अधिकाधिक भर दिला जात आहे. दुसरीकडे, लसीकरण मोहीम विस्ताराचे कामही वेगाने सुरू आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागासह जिल्हा-तालुका पातळ्यांवर लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

पॉझिटिव्हिटी दर २३ टक्क्यांवर

दि. १४ मार्चला राज्याचा काेराेना पॉझिटिव्हिटी दर १५.४६ टक्के हाेता. २३ मार्चला ताे थेट २३.६३ टक्के झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. १ ते १५ मार्चदरम्यान राज्यात १ लाख ७४ हजार ३९४ रुग्णांची नोंद झाली. यात सरासरी १९,६२६ दैनंदिन रुग्ण आढळले, तर १६ ते २३ मार्चदरम्यान २ लाख ३ हजार ५६२ रुग्णांची नोंद झाली असून, सरासरी २५,४४५ दैनंदिन रुग्ण आढळले.

दैनंदिन चाचण्या; काेराेना रुग्णांची आकडेवारी

तारीख दैनंदिन चाचण्या दैनंदिन रुग्ण

१३ मार्च ९७,०५७ १५,६०२

१४ मार्च १,०७,५३६ १६,६२०

१५ मार्च ९१,८७० १५,०५१

१६ मार्च १,०५,३६३ १७,८६४

१७ मार्च १,१८,९९३ २३,१७९

१८ मार्च १,२०,३२५ २५,८३३

१९ मार्च १,२६,१५४ २५,६८१

२० मार्च १,३२,९९४ २७,१२६

२१ मार्च १,३७,२२६ ३०,५३५

२२ मार्च १,०५,२९७ २४,६४५

२३ मार्च १,२१,४३१ २८,६९९

२४ मार्च १,२०,२९२ ३१,८५५

Web Title: The number of daily carina tests in the state is over one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.