CoronaVirus News: राज्यात दैनंदिन रुग्णनिदानात झाली कमालीची वाढ, १३,१६५ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:08 AM2020-08-20T04:08:39+5:302020-08-20T04:09:15+5:30

CoronaVirus News: सध्या १ लाख ६० हजार ४१३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

The number of daily diagnoses in the state has increased dramatically, with 13,165 new patients | CoronaVirus News: राज्यात दैनंदिन रुग्णनिदानात झाली कमालीची वाढ, १३,१६५ नवे रुग्ण

CoronaVirus News: राज्यात दैनंदिन रुग्णनिदानात झाली कमालीची वाढ, १३,१६५ नवे रुग्ण

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात १३ हजार १६५ रुग्ण व ३४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांत बुधवारी नोंद झालेले रुग्ण निदान सर्वाधिक आहे. परिणामी, राज्यात कोरोना बाधितांची संख्या ६ लाख २८ हजार ६४२ झाली असून मृतांचा आकडा २१ हजार ३३ झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के झाले असून मृत्यूदर ३.३५ टक्के झाले आहे. सध्या १ लाख ६० हजार ४१३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ३४६ मृत्यूंमध्ये मुंबई ४६, ठाणे ५, ठाणे मनपा ९, नवी मुंबई ८, कल्याण डोंबिवली मनपा १२, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भार्इंदर मनपा ३, पालघर ८, वसई विरार मनपा ६, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक २, नाशिक मनपा ३, मालेगाव मनपा १, अहमदनगर ७, अहमदनगर मनपा ६, धुळे २, धुळे मनपा १, जळगाव ८, जळगाव मनपा १, पुणे २१, पुणे मनपा ३८, पिंपरी चिंचवड मनपा २७, सोलापूर १५, सातारा ९, कोल्हापूर १३, कोल्हापूर मनपा २, सांगली ६, सांगली मिरज कुपवाड मनपा १२, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद १, हिंगोली १, परभणी मनपा ३, लातूर १, लातूर मनपा २, उस्मानाबाद ६, बीड २, अकोला १, अकोला मनपा १, यवतमाळ १०, नागपूर ३, नागपूर मनपा २३, वर्धा १, भंडारा ४, गोंदिया १ आणि अन्य राज्य / देशातील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात दिवसभरात ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी १८.८३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
वसईत चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
वसई : वसई-विरार शहरात बुधवारी बाधित रुग्ण घटले असून केवळ १६४ रुग्ण तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १८५ रुग्णांना घरी सोडण्यातही आल्याची माहिती पालिकेने दिली.
रायगडमध्ये ४२२ नवीन रु ग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी १९ आॅगस्ट रोजी ४२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत ३३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
>ठाणे जिल्ह्यात बुधवारी १३५३ रुग्ण वाढले
ठाणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १३५३ रुग्णांसह ३५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख नऊ हजार ८८५, तर मृतांची संख्या आता तीन हजार १४२ झाली आहे. यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३२५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ३६१ रुग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ठाणे महानगरपालिका हद्दीत २११ बाधितांची तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ११५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात ८२ नवे रुग्ण वाढले असून तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच उल्हासनगरात ३४ रुग्णांची तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये २६ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ५४६ तर मृतांची १७५ झाली. बदलापूरमध्ये ६३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या तीन हजार ६०३ इतकी झाली. तसेच ठाणे ग्रामीण भागात १३६ नव्या रुग्णांची भर पडली असून एका मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या आठ हजार २७५ तर मृतांची २५३ वर गेली आहे

Web Title: The number of daily diagnoses in the state has increased dramatically, with 13,165 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.