Join us

मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाची रुग्ण संख्या २१ दिवसांत तिप्पट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 8:31 PM

Mumbai News: मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीच्या आजाराचा ताप वाढतो आहे. गेल्या २१ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे २३४, डेंग्यू - ९१, गॅस्ट्रो - २००, चिकनगुनीया - १२ तर लेप्टोचे ६  रुग्ण आढळले.  

मुंबईमुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीच्या आजाराचा ताप वाढतो आहे. गेल्या २१ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे २३४, डेंग्यू - ९१, गॅस्ट्रो - २००, चिकनगुनीया - १२ तर लेप्टोचे ६  रुग्ण आढळले.  मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका कायम आहे.

गेल्या दीड वर्षापासून मुंबईकर कोरोना विरोधात लढा देत आहेत. प्रभावी उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी आदी उपाययोजनांमुळे कोरोनाची पहिली व दुस-या लाटेला थोपवण्यात व  तिसरी लाट येण्यापूर्वीच परतवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमाचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सध्य़ा कोरोना नियंत्रणात असला तरी पावसाळ्यात उद्भवणा-या साथीच्या आजारांचे संकट आजही कायम आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, तसेच पाणी गाळून आणि उकळून प्यावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

१ ते २१ नोव्हेंबरपर्यंत रुग्णांची स्थिती -मलेरिया - २३४डेंग्यू  - ९१गॅस्ट्रो - २००कावीळ - २४चिकनगुनीया - १२लेप्टो - ६स्वाईन फ्ल्यू - १

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाडेंग्यूआरोग्य