मुंबईकरांची दुबईवारी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:34+5:302021-04-21T04:07:34+5:30
मुंबई : मुंबई विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. दुबईत लसीकरण सर्वांसाठी खुले ...
मुंबई : मुंबई विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. दुबईत लसीकरण सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने फायझरची लस घेण्यासाठी मुंबईकरांची दुबईवारी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, दुबईला सर्वाधिक प्रवाशांनी पसंती दिली. त्याखालोखाल न्यूयॉर्क आणि माले या देशांत जाणाऱ्यांची संख्या होती. जानेवारी ते मार्च २०२१ या काळात मुंबई विमानतळावरून १ लाख ६० हजार १६९ प्रवाशांनी दुबईसाठी प्रवास केला. त्यासाठी विमानफेऱ्यांची संख्या कोरोना काळाच्या तुलनेत ८ पटीने वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* कोरोना काळातील आकडेवारी (टर्मिनल १)
दररोजची उड्डाणे - १०२
दररोजचे प्रवासी - सुमारे १२ हजार (येणारे आणि जाणारे)
सर्वाधिक देशांतर्गत प्रवासी हाताळणारी पहिली तीन विमानतळे
१) दिल्ली २) मुंबई ३) बंगळुरू
-------------------------------