नवी मुंबई : बेकायदा वाहतूक करणा-या वाहनांवर पनवेल वाहतूक शाखेने मंगळवारी कारवाई केली. यामध्ये अवजड वाहनांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६० वाहनांचा सहभाग होता. पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ अवजड वाहने, १५ हेल्मेट न बाळगणे , १२ चारचाकी वाहने, ५ दुचाकी वाहनांचा यामध्ये सहभाग होता. तसेच पाच दिवसांच्या कालावधीत ७ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. सायन - पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यावेळी मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात घडत असतात, अशा वाहन चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
डेंग्यू रुग्णांची संख्या पालिकेने दडवली
By admin | Published: November 19, 2014 3:55 AM