राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाखांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:06 AM2021-05-22T04:06:35+5:302021-05-22T04:06:35+5:30

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शुक्रवारी चार लाखांच्या खाली आहे. दिवसभरात २९ हजार ६४४ नव्या बाधित रुग्णांची ...

The number of patients undergoing treatment in the state is below four lakh | राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाखांच्या खाली

राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाखांच्या खाली

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शुक्रवारी चार लाखांच्या खाली आहे. दिवसभरात २९ हजार ६४४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली असून, बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ४४ हजार ४९२ आहे.

राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ५० लाख ७० हजार ८०१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७४ टक्के इतके आहे, तर २९ हजार ६४४ नव्या बाधितांसह आजवरच्या कोरोनाबाधितांचा आकडा ५५ लाख २७ हजार ९२ इतका झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात ५५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत ८६ हजार ६१८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २४ लाख ४१ हजार ७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५ लाख २७ हजार ९२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ९४ हजार ४५७ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत, तर २० हजार ९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्य

आजचा मृत्यूदर - १.५७ टक्के

आजचे मृत्यू - ५५५

आजचे रुग्ण - २९,६४४

सक्रिय रुग्ण - ३,६७,१२१

Web Title: The number of patients undergoing treatment in the state is below four lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.