राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:11+5:302021-07-27T04:06:11+5:30
मुंबई : महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. संपूर्ण देशात एक कोटीहून ...
मुंबई : महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने स्वत:च्या नावावर नोंदविला आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या या कामाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या १ कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४ कोटी १३ लाख १९ हजार १३१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
आतापर्यंत राज्यातील ३ कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यात सुमारे ४१०० लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले, अशी माहिती डॉ. व्यास यांनी दिली.
जिल्हा लाभार्थी
मुंबई ६९६६०६६
पुणे ५९१२४१८
ठाणे ३२३१७३१
कोल्हापूर १७१००७४
नागपूर २२५२४८९
नाशिक १७५५४२९
औरंगाबाद ११११५५४९