Join us

विनामास्क वावरणाऱ्यांची संख्या मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लॉकडाऊन, कठोर निर्बंध लागू करण्यात आले. कोरोनाला हरवायचे असेल तर पहिल्यांदा मास्क लावा; ...

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लॉकडाऊन, कठोर निर्बंध लागू करण्यात आले. कोरोनाला हरवायचे असेल तर पहिल्यांदा मास्क लावा; असे आवाहनदेखील मुंबई महापालिकेने केले. मात्र आजही बहुतांशी नागरिक विनामास्क घराबाहेर कारण नसताना फिरत असून, विनामास्क वावरणाऱ्यांची संख्या मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणावर आहे.

मुंबई महापालिकेकडूनच प्राप्त माहितीनुसार, रविवारच्या आकडेवारीनुसार डी विभाग म्हणजे ग्रँट रोड परिसर येथे विनामास्क वावरणाऱ्यांचा आकडा १२६ होता. एफ/नॉर्थ म्हणजे माटुंगा परिसर येथे २१५, एच/वेस्ट म्हणजे वांद्रे परिसर येथे १९७, के/वेस्ट म्हणजे अंधेरी पश्चिम परिसर येथे १५९, एल वॉर्ड म्हणजे कुर्ला येथे १००, एम/वेस्ट म्हणजे चेंबूर पश्चिम परिसर येथे १२६ एवढी प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. रविवारी दिवसभरात १ हजार ८२८ विनामास्कची प्रकरणे नोंदविण्यात आली असून, या सर्वांकडून ३ लाख ६५ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

----------------

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर त्यांना एक मास्क ‘विनामूल्य’ देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता.

----------------

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे.

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकतादेखील समजावून सांगितली जात आहे.

----------------

२३ मेपर्यंत झालेली कारवाई / एकूण प्रकरणे / वॉर्डनिहाय

झोन १

ए ९८७३०

बी ४८६०९

सी ५७२८६

डी ६९६१९

ई ६५१४७

----------------

झोन २

एफ/साऊथ १०५४०६

एफ/नॉर्थ १०९४११

जी/साऊथ १०८८७८

जी/नॉर्थ १०१९७९

----------------

झोन ३

एच/ईस्ट ९८३८२

एच/वेस्ट ८४९५६

के/ईस्ट १३८५८९

----------------

झोन ४

के/वेस्ट १८७८१०

पी/साऊथ १०२८७७

पी/नॉर्थ १०५५२३

----------------

झोन ५

एल १३८७१८

एम/ईस्ट ३६९१३

एम/वेस्ट ९५८५८

----------------

झोन ६

एन १०१०९९

एस १३४६६३

टी ६१९५४

----------------

झोन ७

आर/साऊथ ११७०१६

आर/सेंट्रल १२२३१९

आर/नॉर्थ १०४५०७

----------------