मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने विविध पातळीवर प्रयत्न केले आहेत. अशात एखाद्या इमारतीत रुग्ण आढळल्यावर ती इमारत पालिकेकडून सील केले जाते. त्यात आता या आठवड्यात मुंबईतील सील केलेल्या इमारतींची संख्या तब्बल ४३४ने वाढली आहे. शनिवारी मुंबईतील ५ हजार ३६१ इमारतींमध्ये कोविड रुग्ण आढळल्याने त्या सील करण्यात आल्या होत्या. २१ ऑगस्टपर्यंत ही संख्या ५ हजार ७९५वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १९ हजार इमारती आणि ८९८ वस्त्यांमधील रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.
मुंबईत १५ आॅगस्टला ५ हजार ३६१ इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने त्या सील करण्यात आल्या होत्या. त्यात २ लाख घरातील ७ लाख ५० हजार नागरिकांच्या दैनंदिन वावरावर प्रतिबंध आला होता. शुक्रवार म्हणजेच २१ आॅगस्टपर्यंत ५ हजार ७९५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यात ८ लाखांहून अधिक नागरिक राहत असून २ लाख २० हजार घरे आहेत. सर्वाधिक सील केलेल्या इमारतींची संख्या बोरीवली, अंधेरी पूर्व आणि कांदिवली या पश्चिम उपनगरांमधील परिसरातील आहे, अशी माहिती महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इमारतींबरोबरच प्रतिबंधित केलेल्या वस्त्यांची संख्याही या कालावधीत ३८ने वाढली आहे. १५ आॅगस्टला ५७० वस्त्या आणि चाळी सील करण्यात आल्या होत्या. शुक्रवारपर्यंत ही संख्या ६०८वर पोहोचली आहे. १५ आॅगस्टला ४० लाख ६३ हजार नागरिक सील वस्त्यांमध्ये राहात होते. तर शुक्रवारपर्यंत ही संख्या ३८ लाखपर्यंत खाली आली आहे.
जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून इमारतींमध्ये राहणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सद्यपरिस्थितीत इमारत आणि वस्त्यांमध्ये राहणाºया रुग्णांची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नसली तरी सील झालेल्या इमारतींची वाढलेली संख्या पाहता इमारतीमधील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे अधोरेखित होते.सर्वात जास्त सील इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रमात्र दिलासादायक बाब म्हणजे सील केलेल्या वस्त्यांमधील नागरिकांची संख्या कमी झाली आहे.मुंबईत १५ आॅगस्टला ५ हजार ३६१ इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने त्या सील करण्यात आल्या होत्या. २ लाख घरांतील ७ लाख ५० हजार नागरिकांच्या वावरावर प्रतिबंध आला होता.सील इमारतीबोरीवली ६००अंधेरी-जोगेश्वरी पूर्व ५५१कांदिवली ४६९प्रतिबंधित वस्त्यादहिसर ६४कुर्ला ६०भांडूप-विक्रोळी ५७