जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:46 AM2019-06-14T02:46:11+5:302019-06-14T02:47:11+5:30

मतदारसंघात लागवड : सर्व आमदार, खासदारांनी उपक्रम राबविण्याचे वनमंत्री यांचे आवाहन

The number of trees as much as possible: the determination of the people's representatives for environmental conservation | जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र

जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र

Next

मुंबई : विकासकामे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. प्रदूषण, हवामानातील बदल आणि कमी पाऊस याचा फटका बसत आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या काही खासदारांनी पुढाकार घेत आपल्या मतदारसंघात ‘जेवढी मते तेवढी झाडे’ लावण्याचा अनोखा निर्धार जाहीर करत पर्यावरण रक्षणाप्रति आपली कटिबद्धता व्यक्त केली. या सर्व खासदारांचे अभिनंदन करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य तसेच आमदारांना आपल्या विभागात वृक्ष लावण्याचे आवाहन केले आहे.

वातावरणीय बदल, दुष्काळ, पाणी संकट अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी माणसांसमोर आव्हान निर्माण केले असताना त्याला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत़ त्यामध्ये वृक्षलागवड हा सर्वाधिक प्रभावी पर्याय असल्याचे जागतिक स्तरावर मान्य झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने लोकसहभागातून ५० कोटी वृक्षलागवडीचे मिशन हाती घेतले आहे. मागील वर्षात राज्यात २ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची २ कोटी ८२ लाख रोपे लावून, ४ कोटी वृक्षलागवडीची ५ कोटी ४३ लाख रोपे लावून तर १३ कोटी वृक्षलागवडीची १५ कोटींहून अधिक रोपे लावून पूर्तता झाली आहे.
पावसाळा सुरू झाला आहे. आपल्याकडे रोपांची कमतरता नाही. जी व्यक्ती, संस्था राज्यात वृक्षलागवड करू इच्छिते त्या सर्वांना ‘मागेल त्यांना रोपं’ योजनेतून रोपटे मिळणार आहेत. कोणत्या प्रजातीची रोपे कुठे लावायची याचे वन विभाग मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने आता या वृक्षोत्सवात सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणाप्रतिचे आपले दायित्व पार पाडावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

वनमंत्र्यांकडून खासदारांचे कौतुक

मुंबईतील दक्षिण मध्य मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार राहुल शेवाळे यांनी ‘प्लान्ट अ होप’ नावाने मिळालेल्या मतांएवढी म्हणजे ४ लाख २४ हजार ९१३ झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्याप्रमाणे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘जेवढी मते तेवढी झाडे’ या संकल्पांतर्गत मतदारसंघात ६ लाख झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा दूत होण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे.

वनमंत्र्यांनी राज्यातील सर्व खासदार-आमदारांना पाठविले पत्र
च्लोकसहभागातून दरवर्षी साजºया होणाºया या वृक्षोत्सवात या वर्षी आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष राज्यात लावायचे आहेत. जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत होणाºया वृक्षलागवड मोहिमेत समाजातील सर्व घटक सहभागी होणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी आतापर्यंतच्या वृक्षलागवड कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.

च्परंतु या वेळेस काही खासदारांनी सुरू केलेला ‘मतांएवढी रोपे’ हा उपक्रम वृक्षलागवडीच्या वाटचालीला अधिक सशक्त करणारा आहे. इतर खासदार-आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी वृक्षलागवडीच्या मोहिमेचे अशा प्रकारे नेतृत्व करावे आणि ३३ कोटी वृक्षलागवडीचे ‘वृक्षधनुष्य’ उचलण्यात योगदान द्यावे, असे आवाहन वनमंत्र्यांनी सर्व खासदार-आमदारांना पाठवलेल्या पत्रात केले़

Web Title: The number of trees as much as possible: the determination of the people's representatives for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.