पालिका रुग्णालयात परिचारिकांची भरती, ८६७ पदांसाठी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:15 AM2018-05-09T07:15:42+5:302018-05-09T07:15:42+5:30
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि प्रसूतिगृहात रिक्त असलेल्या ८६७ परिचारिकांच्या पदांसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, महापालिका नर्सिंग स्कूलमधून उतीर्ण झालेल्या मुलींमधूनच ९० टक्के पदे भरण्यात येणार आहेत, तर उर्वरित १० टक्के जागा मुंबईतील अन्य नर्सिंग स्कूलमधून भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे १४ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेत नुकतीच चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठी मेगाभरती करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता परिचारिकांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे भरण्यात येत आहेत.
या पदासाठी अर्ज करणारी उमेदवार महापालिका नर्सिंग शाळेतून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफेरी डिप्लोमा उत्तीर्ण असावी. इच्छुक उमेदवारांनी १४ मेपर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आपला अर्ज पाठवावा, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाकडून पालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.
येथे करा अर्ज
च्पालिका रुग्णालयात व प्रसूतिगृहात अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका एफ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, आवक जावक विभाग, रूम नंबर ५६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई - ४०००१२ या पत्यावर १४ मे पर्यंत पाठवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पात्रतेचे निकष
च्महापालिका नर्सिंग शाळेतून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफेरी डिप्लोमासह उत्तीर्ण झालेल्या मुलींमधून ७७९ उमेदवार निवडण्यात येणार आहेत, तर उर्वरित ८८ पदे मुंबईतील अन्य नर्सिंग स्कूलमधून भरण्यात येणार आहे.
येथे मिळेल माहिती
च्पालिकेचे संकेतस्थळ ँ३३स्र://स्रङ्म१३ं’.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल यावर माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.