Join us

महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी मतदान केंद्रावर पाळणाघर

By सीमा महांगडे | Published: May 20, 2024 8:52 PM

मुंबई - उपनगरात मतदान केंद्रावर महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी पाळणाघराची सोय करण्यात आली होती. उन्हाचा त्रास होऊ नये आणि रांगांमध्ये पालकांसोबत ...

मुंबईउपनगरात मतदान केंद्रावर महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी पाळणाघराची सोय करण्यात आली होती. उन्हाचा त्रास होऊ नये आणि रांगांमध्ये पालकांसोबत तिष्ठत उभे राहू नये म्हणून त्यांच्या लहान मुलांसाठी या पाळणाघरांची सुविधा अंगणवाडी सेविकांमार्फत उपलब्ध करण्यात आली होती. 

कांदिवली पूर्वच्या पोलिंग सेंटर ३५ , ठाकूर विद्यामंदिरच्या केंद्रावर ही सुविधा उपलब्ध होती. अंगणवाडी सेविका ज्योती जाधव या मतदानासाठी पालकांसोबत येणाऱ्या लहान मुलांची काळजी घेत होत्या. अंगणवाडीतील खेळणी ही या मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

त्या येणाऱ्या मुलांच्या पालकांची नावे आणि क्रमांक याची नोंद करून घेत होत्या आणि त्यांना काय हवे नको त्याकडे लक्ष देत होत्या. अनेक पालकांना घरी कोणीच नसल्यामुळे मुलांना सोबतघेऊन बाहेर पडावे लागते अशा वेळी रांगा , गर्दी आणि उन्हाचा त्रास मुलांना होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे ज्योती जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :मतदानमुंबई