मुंबई : राज्यातील परिचारिकांच्या विविध भत्त्यांमध्ये येत्या तीन महिन्यांत वाढ करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. परिचारिकांसाठी संचालनालय स्थापन करण्याचे तसेच परिचारिकांच्या सेवाशर्ती आणिविद्यावेतनाचा निर्णय येत्या तीन महिन्यात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाच जिल्ह्यातल्या जीएनएमच्या अभ्यासक्रमाचा स्तरबाएससीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ठाणे, नाशिक, आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांत हे करण्यात येणार आहे.
परिचारिकांच्या भत्त्यांत ३ महिन्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:21 AM