कोरोनाच्या काळात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत : तनुजा कंसल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:17+5:302021-05-19T04:07:17+5:30

मुंबई : परिचारिका ज्या दयाळूपणे आणि करुणेने रुग्णांचे अंतःकरण उत्साहित करतात. सर्वसाधारणपणे आणि विशेषतः सर्व देशभर पसरलेल्या कोविड साथीच्या ...

Nurses are playing an important role in Corona's time: Tanuja Kansal | कोरोनाच्या काळात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत : तनुजा कंसल

कोरोनाच्या काळात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत : तनुजा कंसल

googlenewsNext

मुंबई : परिचारिका ज्या दयाळूपणे आणि करुणेने रुग्णांचे अंतःकरण उत्साहित करतात. सर्वसाधारणपणे आणि विशेषतः सर्व देशभर पसरलेल्या कोविड साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्यात परिचारिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, मग ती वैद्यकीय लक्ष देण्याच्या स्वरूपात असो किंवा काही प्रकारचे प्रोत्साहन देणारे शब्द असो, असे मत मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा तनुजा कंसल यांनी व्यक्त केले.

प्रत्येक वर्षी १२ मे रोजी परिचारिकांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस आधुनिक नर्सिंग संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा वर्धापन दिन साजरा केला जाती.

जागतिक परिचारिका दिनाचा विषय ‘भविष्यातील आरोग्य सेवेसाठी एक दृष्टिकोन - नेतृत्वासाठी एक आवाज’ या विषयावर कंसल बोलत होत्या. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या भायखळा येथील भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयातील परिचारिकांना ३० हजार रुपये प्रतीकात्मक पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कंसल पुढे म्हणाल्या की, परिचारिकांचे प्रेम, काळजी आणि समजून घेण्यामुळे बर्‍याच लोकांच्या आयुष्यात बदल झाला आहे. परिचारिका त्यांच्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जाऊनही रुग्णांसाठी झोकून देऊन पूर्ण समर्पणाने काम करीत आहेत. परिचारिकांनी केलेल्या प्रामाणिक आणि अतुलनीय कार्याचे कौतुक केले.

Web Title: Nurses are playing an important role in Corona's time: Tanuja Kansal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.