शिक्षणासाठी पोषक वातावरणनिर्मिती आवश्यक - काकोडकर

By admin | Published: September 18, 2016 01:26 AM2016-09-18T01:26:58+5:302016-09-18T01:26:58+5:30

लहान मुले ही पर्यावरणातून विविध गोष्टी शिकत असतात. शिक्षणाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतील.

Nutrition for Education needs Education - Kakodkar | शिक्षणासाठी पोषक वातावरणनिर्मिती आवश्यक - काकोडकर

शिक्षणासाठी पोषक वातावरणनिर्मिती आवश्यक - काकोडकर

Next


मुंबई : लहान मुले ही पर्यावरणातून विविध गोष्टी शिकत असतात. शिक्षणाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतील. तर त्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमध्ये केले.
एसएनडीटी विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानवी विकास विभागातर्फे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा परिषद ‘अनलॉकिंग द पोटेंशिअल आॅफ अरली चाइल्डहूड एज्युकेशन’ या विषयावर आधारित होती. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अनिल काकोडकर बोलत होते. या वेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, मानवी विकास विभागप्रमुख डॉ. रिटा सोनावत, पोद्दार जम्बो किड्सच्या संचालिका स्वाती वत्स उपस्थित होत्या. शिक्षणाविषयी काकोडकर म्हणाले की, लहान मुले निरीक्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जिज्ञासेतून शिकत असतात. शहरात विद्यार्थ्यांना पोषक वातावरण असते, पण गावागावांमध्ये तसे वातावरण नसते. अशा वेळी ग्रामीण भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.
कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या की, तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही शिक्षकांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. लहानपणापासून मोबाइल हाताळायला शिकणाऱ्या मुलांना या माध्यमातून काहीतरी शिकायला मिळावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आय लव्ह माय फ्रुट’ या विशेष अ‍ॅपचे अनावरण या वेळी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या अ‍ॅपच्या माध्यमातून देशभरात आढळणाऱ्या विविध फळांची माहिती चिमुकल्यांना होणार आहे. अंगणवाडी शिक्षकांना शिकविण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. रिटा सोनावत यांनी सांगितले. दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रांसोबत विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासासाठी या वेळी स्टोरी टेलिंग, व्हाइस मोड्युलेशन या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Nutrition for Education needs Education - Kakodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.