हे प्रभू, लोकलच्या भोंग्याचा आवाज कमी करा

By admin | Published: March 31, 2017 07:01 AM2017-03-31T07:01:54+5:302017-03-31T07:01:54+5:30

उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या आवाजासह मोठमोठ्याने वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यात यावी

O Lord, diminish the voice of the locals | हे प्रभू, लोकलच्या भोंग्याचा आवाज कमी करा

हे प्रभू, लोकलच्या भोंग्याचा आवाज कमी करा

Next

मुंबई : उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या आवाजासह मोठमोठ्याने वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यात यावी; या प्रमुख मागणीसाठी आवाज फाउंडेशनच्या संयोजक सुमेरा अब्दुल अली यांनी सोशल नेटवर्क साईटवर अभियान हाती घेतले आहे. अभियानांतर्गत सुमेरा यांनी सोशल नेटवर्क साईट्सहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या ध्वनिप्रदूषणाबाबत आपली कैफीयत मांडली आहे.
या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सुमेरा यांनी मुंबईकरांना केले आहे. आवाज फाउंडेशनने वांद्रे ते सीएसटी आणि ठाणे ते सीएसटीदरम्यानच्या नव्या आणि जुन्या लोकलच्या भोंग्यांसह उर्वरित आवाजाची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)


(आवाजाचे प्रकार : क्रॉसिंग टे्रन, स्लो स्पीड, हॉर्न) जुन्या उपनगरीय गाड्या : वांद्रे ते सीएसटी

ठिकाणआवाज
(डेसिबल)
वांद्रे स्थानक७२
मिठी पूल८७
माहीम जंक्शन९७.७
वडाळा रोड६८.८
शिवडी स्थानक६६.६
शिवडी-कॉटन ग्रीन८३
कॉटन ग्रीन स्थानक७४.३
कॉटन ग्रीन पूल७२.३
मशीद ७०.१
मशीद-सीएसटी९२.७
सीएसटी८७
सीएसटी९२.१


नव्या उपनगरीय रेल्वे गाड्या : सीएसटी ते ठाणे

ठिकाणआवाज
(डेसिबल)
सीएसटी८२.३
सीएसटी८८.८
मशीद ते भायखळा७४
भायखळा९१.६
दादर७४.१
दादर६६.९
दादर ते कुर्ला७६
कुर्ला८२
कुर्ला ते घाटकोपर८२.७
घाटकोपर७१.९
घाटकोपर ते मुलुंड७४.८
मुलुंड६८
मुलुंड ते ठाणे७२
मुलुंड ते ठाणे८७

Web Title: O Lord, diminish the voice of the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.