मुंबई : उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या आवाजासह मोठमोठ्याने वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यात यावी; या प्रमुख मागणीसाठी आवाज फाउंडेशनच्या संयोजक सुमेरा अब्दुल अली यांनी सोशल नेटवर्क साईटवर अभियान हाती घेतले आहे. अभियानांतर्गत सुमेरा यांनी सोशल नेटवर्क साईट्सहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या ध्वनिप्रदूषणाबाबत आपली कैफीयत मांडली आहे. या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सुमेरा यांनी मुंबईकरांना केले आहे. आवाज फाउंडेशनने वांद्रे ते सीएसटी आणि ठाणे ते सीएसटीदरम्यानच्या नव्या आणि जुन्या लोकलच्या भोंग्यांसह उर्वरित आवाजाची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)(आवाजाचे प्रकार : क्रॉसिंग टे्रन, स्लो स्पीड, हॉर्न) जुन्या उपनगरीय गाड्या : वांद्रे ते सीएसटीठिकाणआवाज (डेसिबल)वांद्रे स्थानक७२मिठी पूल८७माहीम जंक्शन९७.७वडाळा रोड६८.८शिवडी स्थानक६६.६शिवडी-कॉटन ग्रीन८३कॉटन ग्रीन स्थानक७४.३कॉटन ग्रीन पूल७२.३मशीद ७०.१मशीद-सीएसटी९२.७सीएसटी८७सीएसटी९२.१नव्या उपनगरीय रेल्वे गाड्या : सीएसटी ते ठाणेठिकाणआवाज (डेसिबल)सीएसटी८२.३सीएसटी८८.८मशीद ते भायखळा७४भायखळा९१.६दादर७४.१दादर६६.९दादर ते कुर्ला७६कुर्ला८२कुर्ला ते घाटकोपर८२.७घाटकोपर७१.९घाटकोपर ते मुलुंड७४.८मुलुंड६८मुलुंड ते ठाणे७२मुलुंड ते ठाणे८७
हे प्रभू, लोकलच्या भोंग्याचा आवाज कमी करा
By admin | Published: March 31, 2017 7:01 AM