ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 04:45 AM2020-03-05T04:45:43+5:302020-03-05T04:45:46+5:30

विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याची माहिती बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.

OBC students get scholarships | ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

Next

मुंबई : अनुसुचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याची माहिती बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.
२०१८- १९ मध्ये बहुजन कल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी पोर्टल सुरू केले. या वर्षात ७ लाख ४८ हजार विद्यार्थी पात्र असून, ६८९ कोटी रूपयांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली असून, मार्च अखेरपर्यंत दुसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती दिली जाईल, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्यावेळीच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल का, त्यांना त्रास न होता अधिक सुधारित आणि सुटसुटीतपणा या योजनेत आणता येईल का यासाठी शासन अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती ़त्यांनी दिली़

Web Title: OBC students get scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.